अंधश्रद्धेतून महिलेवर बलात्कार

By Admin | Updated: May 19, 2014 05:44 IST2014-05-19T04:59:59+5:302014-05-19T05:44:46+5:30

अंधश्रद्धेत अडकलेल्या महिलेला जादूटोणा आणि मंत्रतंत्राने उपाय करण्याचे आमिष दाखवून बलात्कार करणार्‍या व्यक्तीविरोधात विक्रोळी पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rape of woman through superstition | अंधश्रद्धेतून महिलेवर बलात्कार

अंधश्रद्धेतून महिलेवर बलात्कार

मुंबई : अंधश्रद्धेत अडकलेल्या महिलेला जादूटोणा आणि मंत्रतंत्राने उपाय करण्याचे आमिष दाखवून बलात्कार करणार्‍या व्यक्तीविरोधात विक्रोळी पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विक्रोळी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. महिलेला करणी झाल्याचे सांगून जादूटोणा आणि मंत्रतंत्राचा उपाय करण्याचे आमिष दाखवून गणेश नामदेव भांगरे या २९ वर्षीय व्यक्तीने महिलेवर वारंवार बलात्कार केला. बळीत पडलेली महिला आणि गणेश भांगरे एकमेकांना ओळखतात. याच ओखळीचा फायदा घेत भांगरे याने महिलेला करणी झाल्याचे सांगितले. जादूटोणा आणि मंत्रतंत्र करण्यासाठी गणेश महिलेला टागोरनगर येथील मातछाया बिल्डिंग नंबर ४९ मधील स्वत:च्या घरी बोलावून जबरदस्तीने बलात्कार करीत होता. जादूटोणा आणि मंत्रतंत्राच्या विधीसाठी गणेशने महिलेकडून ८0 हजार रुपये घेतले होते. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने सदर महिलेने गणेशविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी गणेशविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Rape of woman through superstition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.