अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास अटक
By धीरज परब | Updated: November 24, 2023 19:32 IST2023-11-24T19:31:15+5:302023-11-24T19:32:18+5:30
आरोपीने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर १८ ते २२ नोव्हेम्बर दरम्यान बलात्कार केला.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास अटक
मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्या प्रकरणी पॉक्सोचा गुन्हा गुरुवारी दाखल करण्यात आला आहे. ह्यातील आरोपी हा ३० वर्षांचा असून तो मुंबईच्या भांडुप भागात राहणारा आहे.
आरोपीने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर १८ ते २२ नोव्हेम्बर दरम्यान बलात्कार केला. या प्रकरणी वरिष्ठ निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केली आहे. सहायक निरीक्षक तुकाराम सुकूंडे हे अधिक तपास करत आहेत.