खंडणीखोर डॉ. यादवला गाझियाबाद येथे अटक
By Admin | Updated: April 23, 2017 03:58 IST2017-04-23T03:58:07+5:302017-04-23T03:58:07+5:30
बिल्डरांकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल झाल्यानंतर गेल्या महिन्याभरापासून फरार असलेल्या डॉ. अनिल यादवला पालघर गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी

खंडणीखोर डॉ. यादवला गाझियाबाद येथे अटक
वसई : बिल्डरांकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल झाल्यानंतर गेल्या महिन्याभरापासून फरार असलेल्या डॉ. अनिल यादवला पालघर गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी दिल्लीजवळील गाझियाबदमधून अटक केली. रविवारी त्याला वसईत आणले जाणार आहे.
माहिती अधिकारात माहिती मागवून बिल्डरांकडून खंडणी वसूल करीत असल्याची चर्चा खाजगीत होत होती. पण कागदोपत्री तक्रारदार नसल्याने त्याच्यावर कारवाई होत नव्हती. मात्र गेल्या महिन्यात गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा साथीदार अमोल पाटील याला एका बिल्डरकडून दोन लाखाची खंडणी घेताना पकडले होते. त्यानंतर पोलिसांनी यादव विरोधात खंडणीचा पहिला गुन्हा दाखल केला होता. तक्रारदार बिल्डरला बंदुकीचा धाक दाखवून त्याने खंडणी मागितल्याचे तपासात उजेडात आले होते.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. त्यानंतर नालासोपार्यातील बिल्डर वंदेश पुरव यांनी त्याने ३३ लाखांची खंडणी घेतल्याची तक्रार दिली होती. अनिधकृत बांधकामाची तक्रार करण्याची धमकी देऊन, बंदुकीचा धाक दाखवून खंडणी घेतल्याची तक्र ार त्यांनी केली होती. या वरून खंडणीची दुसरा गुन्हा दाखल झाला होता.
बांधकामाची तक्रार करण्याची धमकी देऊन खंडणीपोटी पाच कोटी आणि जमीन मागितल्याची तक्रार अनिल गुप्ता यांनी केली होती. त्यावरून वालीव पोलीस ठाण्यात खंडणीचा तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे तो महिनाभर फरार होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी पाच पथके तयार केली होती. तो गाझयिाबाद येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर एका पथकाने तिथून त्याला ताब्यात घेतले. रविवारी यादवला वसईत आणले जाणार आहे. यादवच्या अटकेने बिल्डरांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)