स्टेट बँकेसमोर रांगा ; राष्ट्रवादीतर्फे चहा नाश्ता

By Admin | Updated: November 13, 2016 00:24 IST2016-11-13T00:24:22+5:302016-11-13T00:24:22+5:30

मोदींच्या केंद्र सरकारने भ्रष्टाचाराचा काळा पैसा बाहेर काढण्यासाठी १००० आणि ५०० रु पयांच्या नोटांची बदली े करण्यासाठी नागरिकांनी जव्हारच्या स्टेट बँके समोर अलोट

Range for SBI; Tea Breakfast by NCP | स्टेट बँकेसमोर रांगा ; राष्ट्रवादीतर्फे चहा नाश्ता

स्टेट बँकेसमोर रांगा ; राष्ट्रवादीतर्फे चहा नाश्ता

जव्हार : मोदींच्या केंद्र सरकारने भ्रष्टाचाराचा काळा पैसा बाहेर काढण्यासाठी १००० आणि ५०० रु पयांच्या नोटांची बदली े करण्यासाठी नागरिकांनी जव्हारच्या स्टेट बँके समोर अलोट गर्दी पाहायला मिळत असून, बँकेच्या बाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. त्यामुळे या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने, व गैरसोय लक्षात घेवून जव्हार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना शनिवारी नाश्ता, केळी, पाणी, वडा-पावचे वाटप करण्यात आले आहे. याबद्दल समाधान व्यक्त झाले.
व्यापारी, कामगारवर्ग, कर्मचारी यांना या निर्णयामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पैसे काढणे, पैसे भरणा करणे यासाठी दिवसभर बँकांसमोरील रांगेत असलेल्यांना राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षातर्फे पाणी बाटली, नास्ता, केळी वाटप करण्यात आले.
या वेळी राष्ट्रवादी पक्षाचे माजी नगराध्यक्ष रियाज मनियार, नगरसेवक संजय वांगड, शोएब लुलानिया, अशरफ घाची, कोंग्रेस पक्षाचे पालघर जिल्हा सेक्र ेटरी धनंजय खेडकर, जावेद पटेल आदि मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Range for SBI; Tea Breakfast by NCP