मिरवणुकीसाठी त्यांची ढोल-ताशांची रंगीत तालीम

By Admin | Updated: September 1, 2014 17:08 IST2014-09-01T05:01:23+5:302014-09-01T17:08:43+5:30

गणपती आले आणि गणपती निघाले असे वातावरण सध्या आहे. गणेशाचे आगमन म्हणजे साऱ्यांसाठीच उत्साहाचे वातावरण असते

Rangate training of drum-cards for procession | मिरवणुकीसाठी त्यांची ढोल-ताशांची रंगीत तालीम

मिरवणुकीसाठी त्यांची ढोल-ताशांची रंगीत तालीम

पनवेल : गणपती आले आणि गणपती निघाले असे वातावरण सध्या आहे. गणेशाचे आगमन म्हणजे साऱ्यांसाठीच उत्साहाचे वातावरण असते. त्याच्या येण्यावेळी जेवढा जल्लोष असतो तेवढाच जल्लोष त्याच्या असण्याने आणि त्याला त्याच्या निवासस्थानी पोहोचविताना निघालेल्या विसर्जन मिरवणुकीदरम्यानही दिसून येतो. सध्या गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारीही जोरोशोरोत आहे. पनवेलातील झोपडपट्टी भागातील तरूणही सध्या बँडबाजा, ढोलताशांची जोरात तयारी करीत असून त्यांची रंगीत तालीम रात्ररात्र चालू असलेली सध्या दिसून येत आहे.
गणेशोत्सवाचे दिवस म्हणजे आनंदाचे आणि उत्साहाचे दिवस असतात. फटाक्यांची आतषबाजी, विद्युत रोषणाई आणि बाप्पा आमच्याकडेही आलेत हे सांगण्यासाठी वाद्यांचे झंकार सध्या साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहेत.गणेशाला त्याच्या घरी पोहोचविताना ढोल-ताशांचे झंकार उमटतात.

Web Title: Rangate training of drum-cards for procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.