जव्हारमध्ये रमजान ईद अत्यंत उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 22:56 IST2019-06-05T22:56:15+5:302019-06-05T22:56:26+5:30

हिंदू बांधवांनीही दिल्या गुलाबपुष्पासह शुभेच्छा

Ramadan Id celebrates with great enthusiasm in Jawhar | जव्हारमध्ये रमजान ईद अत्यंत उत्साहात साजरी

जव्हारमध्ये रमजान ईद अत्यंत उत्साहात साजरी

जव्हार : रमजानचे पूर्ण महिन्याचे कडक रोजे पाळून मुस्लिम बांधवांनी चंद्रदर्शन झाल्याने बुधवारी सकाळी ९ वाजता ईदगाह मैदानात ईद उल फित्रची नमाज अदा केली, यावेळी शहरातील व परिसरातील मुस्लिम बांधव बच्चे कंपनीसह नवीन पोशाखात मोठ्या संख्येने उपस्थित होते,

यावेळी सुन्नी जामा मशीदचे मौलाना नौशाद यांनी ईदचा दिवस ज्यांनी महीनाभर रोजे ठेवले त्यांनी पाच वेळा नमाज पठन केले, कुरआन पठन केले, ज्यानी अल्लहा ला राजी करण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या साठी हा दिवस खुप आनंदाचा असतोे, तसेच नमाज नंतर गळा भेट घेताना मनात वैर असेल तर ते काढून टाका एकमेकात जर काही वाद असतील तर ते मनापासून मिटवून टाका असा शुभेच्छा संदेश दिला, तसेच सुन्नी मुस्लिम ट्रस्ट चे अध्यक्ष सै. खलील कोतवाल यानी ईदच्या सर्वाना शुभेच्या दिल्या.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुनील भुसारा, दिलीप तेंडुलकर, नगरसेवक वैभव अभ्यंकर, गणेश राजपूत, माजी नगराध्यक्ष संदीप वैद्य, बळवंत गावित, अशरफ लुलानिया, नगरसेवक भरत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक राकेश पगारे, सुरळकर आदिनी मुस्लिम बांधवाना ईदगाहच्या बाहेर पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या.

दुपार नंतर मुस्लिम बांधव कुटुंबासहीत गावभर गळा भेट देण्यासाठी फिरतांना दिसत होते. मोठी गर्दी करून रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. जव्हार हनुमान पॉईंट व संनसेट पॉईंट येथे मुस्लिम बांधवांची गर्दी दिसत होती.

वाड्यात ईद उत्साहात
वाडा : तालुक्यात आज रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तालुक्यातील वाडा, खानिवली, कुडूस, वडवली व नारे या मुस्लिम लोकवस्ती असलेल्या गावात आज आनंदाचे वातावरण होते. आज सकाळीच सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. त्यानंतर एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

हिंदू बांधवानाही मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन शुभेच्छा देत सणाचा आनंद घेतला. सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भोईर, अशोक पाटील, कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते रामदास जाधव, ग्रामपंचायत सदस्य सचिन जाधव, नितीन जाधव, अनंता दुबेले यांनी मुस्लिम समाजाचे नेते मुस्तफा मेमन, इरफान सुसे यांना घरी जाऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.

सहा वर्षांच्या मुलाने केले पूर्ण रोजे
मनोर : रमजान ईद येथे उत्साहाने साजरी करण्यात आली नमाजानंतर टेन मनोर परिसरातील मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. हिंदू बांधवांनी ही शुुभेच्छा देऊन शीरखुर्म्याचा आस्वाद घेतला. यावेळी सहा वर्षाच्या चिमुकल्याने पूर्ण रोजे ठेवल्याने त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव सुरू होता. रमजान महिना मुस्लिम धर्मा मध्ये सर्वात पवित्र मानला जातो चंद्र दर्शन झाले की रोजे ठेवायला सुरवात होते १० वर्षा पासून ते वयोवृध्दांपर्यंत सर्व जण रोजा ठेऊ शकतात ते करण्याचा फर्ज त्यांना लागू आहे. परंतु मनोर मधील यायहा फरहान लोनबाल या सहा वर्षीय मुलाने रमजान चे पूर्ण रोजे ठेवल्याने त्याचे मनोर, पालघर भिवंडी ठाणे परिसरात कौतुक केले जात आहे कारण एवढ्या उन्हात त्याने पूर्ण महिना रोजे करून मुस्लिम समाज्या मध्ये एक संदेश दिला, असे त्याचे आजोबा रियाज मुल्ला यांनी लोकमतला सांगितले टेन-मनोर परिसरात ईद असो की दिवाळी दोन्ही समाज्यात एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा देण्याची परंपरा दीर्घकाळापासून चालत आली आहे आणि ती आजही पाळली केली

Web Title: Ramadan Id celebrates with great enthusiasm in Jawhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.