शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
2
मिचेल स्टार्कचा 'Spark'! ट्रॅव्हिस हेडचा भन्नाट चेंडूवर उडवला त्रिफळा, Video 
3
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
4
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
5
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
6
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
7
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
8
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
9
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
10
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
11
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
12
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
13
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
14
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
15
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
16
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
17
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
18
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
19
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
20
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले

वाड्यामधील व्यापा-यांकडून प्लास्टिकच्या पिशव्यांना रामराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 11:37 PM

प्लास्टिक पिशवीच्या वापरामुळे होणारी अस्वच्छता शहराला बकाल करीत असून जागोजागी साठलेल्या कचºयाच्या ढिगांमध्ये या पिशव्या दिसत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याचे

वाडा : प्लास्टिक पिशवीच्या वापरामुळे होणारी अस्वच्छता शहराला बकाल करीत असून जागोजागी साठलेल्या कचºयाच्या ढिगांमध्ये या पिशव्या दिसत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याचे येथील व्यापाºयांच्या लक्षात आल्याने त्यांनी आपल्या दुकानाबाहेर तसे फलक लावून प्लास्टिकच्या पिशव्याविरोधातील मोहीम तिव्र केली आहे.प्लास्टिकपासून पर्यावरणाला अधिक धोका असल्याने शहरातील ‘आपला वाडा सोशल गृप’ ह्या व्हाट्सप गृपने याबाबत जनजागृती करत प्लॅस्टिक पिशवी वापरावर बंदीचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत येथील व्यापारी वर्गातील काही प्रमुख मंडळींनी प्लास्टिक पिशवीचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतला असून तशा सूचना दर्शवणारी फलके व भित्तीपत्रके आपल्या दुकानानबाहेर लावली आहेत. व्यापाºयांच्या या निर्णयाचे वाडा शहरातील नागरिकांकडूनही स्वागत होत आहे.वाड्याच्या समस्या प्रशासना पर्यंत पोहचवण्यासाठी व त्यावर तातडीने उपाययोजना व्हावी या दृष्टीने ‘आपला वाडा’ या व्हॉट्स अ‍ॅप गृपच्या माध्यमातून शहरातील नागरिकांसाठी व व्यापाºयांसाठी प्लास्टिक पिशवी समस्येविषयी चर्चा घडविण्यात आली होती. त्यावर व्यापाºयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.प्लॅस्टिक पिशवीमुळे होणाºया दुष्परिणामांची जाणीव आहे. ‘आपला वाडा’ या सोशल गृपने घेतलेल्या भूमिकेचे एक व्यापारी म्हणून मी स्वागत करीत असून ग्राहकांनीही यासाठी पुढाकार घ्यायला हवा.- मधुकर महाजन, व्यापारीप्लास्टिकच्या पिशवीचा नष्ट व्हायल शेकडो वर्ष लागतात. त्यामुळे पर्यावरणाची हानी होते. तिच्या वापरावर बंदी घालण्यासाठी समाजमाध्यमाचा वापर करत व्यापारी व जनतेला आवाहन केले. त्याला व्यापाºयांनी प्रतिसाद दिला हे स्वागतार्ह आहे.- विशाल मुकणे, ग्रूप अ‍ॅडमिन,आपला वाडा सोशल गृप

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीVasai Virarवसई विरार