राजीव गांधी योजनेची ओळखपत्रे भिजून नष्ट
By Admin | Updated: August 28, 2015 23:17 IST2015-08-28T23:17:49+5:302015-08-28T23:17:49+5:30
केंद्र सरकारने गोरगरीबांसाठी सुरू केलेल्या राजीव गांधी आरोग्य निरामय योजनेच्या अंमलबजावणी करण्यासंदर्भात प्रशासनाकडून गलथान कारभार होत आहे.

राजीव गांधी योजनेची ओळखपत्रे भिजून नष्ट
वसई : केंद्र सरकारने गोरगरीबांसाठी सुरू केलेल्या राजीव गांधी आरोग्य निरामय योजनेच्या अंमलबजावणी करण्यासंदर्भात प्रशासनाकडून गलथान कारभार होत आहे. याबाबतची आलेली पत्रे एका आरोग्य केंद्रात भिजत पडली आहेत. वास्तविक ही ओळख पत्रे असून महा-ई सेवा केंद्रातर्फे वाटप करण्यात येत असतात. परंतु ती वाटप न झाल्यामुळे पावसात भिजून नष्ट झाली आहेत.
गरीबांना वैद्यकीय खर्च परवडत नसल्यामुळे तत्कालीन संयुक्त लोकशाही आघाडी सरकारने ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत गरजु व्यक्तींना वैद्यकीय खर्च करण्यासाठी केंद्राकडून दिड ते दोन लाखाचे अनुदान दिले जाते. गरजू व्यक्तीने या योजनेअंतर्गत असलेल्या इस्पितळात हे ओळखपत्र दाखवल्यानंतर त्यांना वैद्यकीय खर्चातील काही टक्के भाग केंद्र सरकार उचलत असते.
वसईत आलेली ही ओळखपत्रे आजही नवघर आरोग्य केंद्रामध्ये पावसात भिजत पडली आहेत. यासंदर्भात वैद्यकीय अधिकारी ए. डी. नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही ओळखपत्रे नवघर मध्ये पडून असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.