विक्रमगडला एमआयडीसी उभारा

By Admin | Updated: February 13, 2017 04:40 IST2017-02-13T04:40:16+5:302017-02-13T04:40:16+5:30

या आदिवासीबहुल तालुक्याचा खुंटलेला विकास आणि गरीब, सुशिक्षितांची बेरोजगारी दुर करण्यासाठी शासनाने येथे एमआयडीसी साकारावी,

Raised MIDC to Vikramgad | विक्रमगडला एमआयडीसी उभारा

विक्रमगडला एमआयडीसी उभारा

विक्रमगड : या आदिवासीबहुल तालुक्याचा खुंटलेला विकास आणि गरीब, सुशिक्षितांची बेरोजगारी दुर करण्यासाठी शासनाने येथे एमआयडीसी साकारावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे यांनी केली असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन याबाबत पाठपुरवा करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगीतले़
हा ९४ गावे-खेडया-पाडयांचा डोंगर वस्तीचा १ लाख १४ हजार लोकवस्तीचा आदिवासी तालुका आहे़ मात्र या भागातील विकास गेल्या १७ वर्षापासून खुंटलेला आहे़ रोजगार, वीज, पाणी, शिक्षण, रस्ते, दळणवळणाचे स्त्रोत या पायाभूत सुविधा नसल्यामुळे तो अविकसीत राहिला आहे. त्यामुळेच हजारो रहिवाशांना शेतीचा हंगाम संपला की, रोजगारासाठी स्थलांतरीत व्हावे लागते. वीटभट्टी मच्छिमारी आणि बांधकाम व्यवसाय थंडावल्यामुळे आता हा रोजगारही मिळेनासा झाला आहे. त्यामुळे इथे एमआयडीसी होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
तालुक्याच्या निर्मीतीपासुन येथे अनेक कार्यालये अतित्वात आलेली नाही त्यामध्ये स्टेटबॅक, न्यायालय, प्रांतकार्यालय, टेलिफोन कार्यालय, बांधकाम उपविभाग, पाणीपुरवठा उपविभाग आदीविध कार्यालये नाहीत. तर तहसीलदार पंचायत समिती यांचा समावेश आहे. सुरु झालेल्या कार्यालयातील निम्म्याहून अधिक पदे रिक्त आहेत. भरलेली पदे हंगामी आहेत. काही अधिकारी कर्मचाऱ्यांना एकाच वेळी चार ठिंकाणांचा चार्ज दिलेले आहेत. ही स्थिती बदलण्याची आवश्यकताही त्यांनी यावेळी विषद केली. (वार्ताहर)

Web Title: Raised MIDC to Vikramgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.