वसई-विरारमध्ये पाऊस तोकडाच
By Admin | Updated: August 18, 2015 00:24 IST2015-08-18T00:24:49+5:302015-08-18T00:24:49+5:30
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिल्याने येत्या उन्हाळ्यामध्ये वसई-विरारकरकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.

वसई-विरारमध्ये पाऊस तोकडाच
वसई : गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिल्याने येत्या उन्हाळ्यामध्ये वसई-विरारकरकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. यंदा उपप्रदेशात १३४३ मिमी पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी १७ आॅगस्टपर्यंत १६९५ मिमी पाऊस पडला होता. पाऊस कमी झाला असला तरी उसगाव व पेल्हार ही धरणे पूर्णपणे भरली आहेत.
वसई-विरार उपप्रदेशामध्ये गेल्या वर्षी एकूण २१३२ मिमी पाऊस पडला होता. यंदा पावसाने अद्याप १५०० मिमीचाही टप्पा गाठलेला नाही. उपप्रदेशाला अजून ८०० ते ९०० मिमी पावसाची गरज आहे. परंतु, सध्या पडत असलेल्या पावसामुळे गेल्या वर्षीचा टप्पा गाठणेही कठीण आहे. सूर्या प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये सध्या ७२.८० टक्के पाण्याचा साठा आहे.
एकंदरीत उपप्रदेशातील पावसाचे प्रमाण व धरणात असलेला पाण्याचा साठा लक्षात घेता पूर्व भागातील भातशेती, बागायती तसेच नागरिकांना यंदा तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.
ग्रामीण भागामध्ये विहिरी, बोअरमुळे ग्रामस्थांना दिलासा मिळू शकतो, पण शहरी भागात मात्र पाणीपुरवठा यंत्रणांनाचीं कसरत होणार आहे.