जव्हारमध्ये पावसाची हजेरी
By Admin | Updated: June 1, 2017 17:27 IST2017-06-01T17:27:03+5:302017-06-01T17:27:03+5:30
जव्हार शहरात ७ जूनला हजेरी लावणारा पाऊस जून महिन्याच्या पहिल्या दिवशी दाखल झाला. ढगांच्या गडगडाटासह दुपारी ४ च्या सुमारास संपूर्ण जव्हार

जव्हारमध्ये पावसाची हजेरी
>ऑनलाइन लोकमत/ हुसेन मेमन
जव्हार, दि. 01 - जव्हार शहरात ७ जूनला हजेरी लावणारा पाऊस जून महिन्याच्या पहिल्या दिवशी दाखल झाला. ढगांच्या गडगडाटासह दुपारी ४ च्या सुमारास संपूर्ण जव्हार शहरामध्ये पावसाने सर्वत्र दाणादाण उडविली.
गुरुवारी दुपारपर्यंत उन्हाचा कडाका इतका जोरात होता की, लोक पाऊस कधी पडेल याची वाट बघत होते. मात्र दुपारी पावसाने जोर पकडून अचानक वर्षाव केला. दरम्यान, लहानग्यांनी पहिल्या पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला.
बघता बघता शहरातील नाले, गटारे, रस्त्यांवर पाणी भरून वाहू लागले. अचानक पडलेल्या पावसामुळे मोटार सायकल स्वार व पादचा-यांचे छत्री व रेनकोट नसल्यामुळे मोठे हाल झाले. काही वेळातच शहरात आल्हाददायक वातवरण निर्माण होऊन गारवा निर्माण झाला आहे.