शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
5
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
6
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
7
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
8
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
9
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
11
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
12
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
13
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
14
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
15
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
16
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
17
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
18
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
19
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

जिल्ह्यात पावसाचे धुमशान, तिघांचा बळी, शहर वाहतूक थंडावली, पूल पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 11:44 PM

अतिवृष्टीमुळे दहीगाव आणि आंबेवाडी येथे दोन ठिकाणी घरे कोसळल्याच्या घटना घडल्या. डहाणूच्या दाभाडी येथे नदी ओलांडत असताना कैलास बाबू नडगे हा वाहून मृत्यू पावला आहे.

डहाणू : अतिवृष्टीमुळे दहीगाव आणि आंबेवाडी येथे दोन ठिकाणी घरे कोसळल्याच्या घटना घडल्या. डहाणूच्या दाभाडी येथे नदी ओलांडत असताना कैलास बाबू नडगे हा वाहून मृत्यू पावला आहे. बोर्डी येथे बारा जणांच्या घरात काल पाणी शिरल्याने त्या घरांच्या पंचनामा करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले तर तालुक्यात गेल्या दोन दिवसात दहीगाव आंबेवाडी ,साये येथे आठ ठिकाणी भिंत कोसळून नुकसान झाले.तर किन्हवली येथेही एक मुलगा बेपत्ता झाला असून त्याचा तपास सुरु आहे.रविवारी रात्री सुरु झालेल्या संततधारेमुळे डहाणूच्या ग्रामीण भागात नद्या ओहोळ दुथडी वाहू लागले. तर ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन प्रमुख राज्यमार्गावरुन पाणी वाहू लागल्याने वाहतूक ठप्प झाली. चारोटी येथील गुलजारी नदीला पूर आल्याने सकाळी आणि दुपारच्या सुमारास पूल पाण्याखाली गेला. खूटखाडी पूल, कोलपाडा येथे पूल पाण्याखाली गेल्याने डहाणू बोर्डी वाहतूक ठप्प झाली. तर कासा येथे सूर्या नदीवरील जूना पूल पाण्याखाली गेला. वाणगाव येथे देदाळे तसेच खडखड येथील पूल पाण्याखाली गेले. त्यामुळे सकाळी वाहतूक ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत बनले.कंक्राटी नदीला पूर आल््याने मसोली परिसरात पाणी शिरले. पूरामूळे डहाणू शहरातील ईराणीरोड वर काही फूट पाणी साचले होते. तर जलाराम परिसर जलमय झाला होता. मसोली परिसरात तसेच बाजारपेठेत काही दुकानात पाणी शिरुन नुकसान झाले. सावटा येथे घरांमध्ये पाणी शिरले आहे. तर कंक्राटी नदीवरीच्या पूराने पूलाचे लोखंडी कठडे तुटले आहेत. चिखले पोलीस चौकीत पाणी शिरले होते. डहाणू शहरात मुसळधार पावसामुळे सतीपाडा, प्रभूपाडा, मसोली, सरावली येथील काही घरांत पाणी गेले होते.मुसळधार पावसाने नालासोपाऱ्याला झोडपलेनालासोपारा : रविवारी रात्रीपासून सोमवार रात्रीपर्यंत झालेल्या धो धो पावसाने नालासोपारा शहराला अक्षरश: झोडपून काढल्याने जागोजागी पाण्याचे तलाव तयार झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. कित्येक सोसायट्यांमध्ये चार ते पाच फूट पाणी तर काही घरामध्येही पाणी घुसले आहे. दुकानामध्येही पावसाचे पाणी घुसल्याने लाखो रु पयांचे दुकानदारांचे नुकसान झाले आहे. वसई तालुक्यात सोमवार रात्रीपासून ३४२ मिमी पाऊस पडला आहे. महानगरपालिकेने ९५ टक्के नालेसफाई केल्याचा दावा केला होता पण धो धो पडणाºया पावसामुळे नालासोपारा पश्चिमेकडील हनुमान नगर, लक्ष्मीबेन छेडा मार्ग, पाटणकर पार्क, एस टी डेपो रोड, समेळ पाडा, चक्र ेश्वर तलाव, सोपारा गाव, गास, सनसिटी रस्ता, उमराळे, नाळे या परिसरात पावसाचे पाणी साचले होते तर नालासोपारा शहरात तर पूर्वेकडील संतोष भवन, महेश पार्क, विजय नगर, टाकी रोड, गाला नगर, शिर्र्डी नगर, अलकापुरी, सेंट्रल पार्क, आचोळे रोड, संख्येश्वर नगर, पाच आंबा या परिसरात पावसाच्या पाण्यामुळे तलावाचे जणू स्वरूप आले होते. नालासोपारा पूर्वेकडील काजूपाडा येथील अप्पा पाडा येथे चाळीमधील एक भिंत कोसळल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली पण कोणतीही जीवितहानी घडली नाही. नालासोपारा रेल्वे फ्लॅटफॉर्म नंबर ३ व ४ वर पावसाचे गुडघाभर पाणी साचल्याने रेल्वेची वाहतूक बंद होती तर मंगळवारी सकाळी वसई रेल्वे स्थानकावरूनच चर्चगेटच्या दिशेने रेल्वे सोडण्यात आल्या होत्या. एकंदर पावसामुळे वसई विरार महानगरपालिका अपयशी ठरली पाणी साचल्याने १० ते १२ तास वीज नव्हती.वाहून गेल्याने शेतकºयाचा मृत्यूकासा : डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नदीत वाहून गेल्याने एका शेतकºयाचा मृत्यू झाला. कैलास नागू नडगे (२८) रा. किन्हवली (बेंज पाडा) असे त्यांचे नाव आहे.रविवार तसेच सोमवारी जोरदार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पूर आला होता. त्यातच सोमवारी दुपारी ते आपल्या शेतात कामासाठी गेले होते. मात्र संध्याकाळी उशीरापर्यंत कैलास घरी न आल्याने घरची मंडळी तसेच ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला पण ते सापडले नाहीत. मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास दमन नदीत त्यांचा मृतदेह आढळला. पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने नदीपार करतांना मृत्यू झाला.बोईसरला ३५३ तर तारापूरला ३५५ मि.मी. पाऊसबोईसर : चार दिवसा पासून मुसळधार कोसळणाºया पावसाने बोईसर व परिसरातील सिडकोसह बैठ्या चाळी व इमारती तसेच गाळ्यांमध्ये (दुकान) पाणीच पाणी झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल तर काही व्यावसायिकांचे लाखोचे नुकसान झाले असून आहे काही इमारतीच्या मीटर व फ्यूज बॉक्स पर्यंत पावसाचे पाणी साचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून विज पुरवठा खंडित करण्यात आला होता बोईसर मंडल क्षेत्रात दि. २ जुलै रोजी सकाळ पर्यंतच्या २४ तासात सरासरी ३५३ मि.मी.तर तारापूरला ३५५ मि. मी.पावसाची नोंद झाली असून बोईसरच्या साईबाबा नगर, दिजय नगर, खोदाराम बाग, मंगलमूर्ती नगर, सिडको कॉलनी, वंजार वाडा, धोडी पूजा, संजय नगर, टाटा कॉलनी समोर पाणी साठलेकाका पुतण्या गेला पावसात वाहूनपालघर : सिल्व्हासा या केंद्रशासित प्रदेशाला लागून असलेल्या जव्हार तालुक्यातील दाभालोन पैकी गुंजुंनपाडा येथील काका पुतण्या नदीच्या पुरात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे.दाभालोन पैकी गुंजुंनपाड्यातील जाना सोनू उंबरसाडा- ६० आणि त्याचा पुतण्या, काकड बाबन उंबरसाडा- ४० हे दोघेही सोमावरी झालेल्या मुसळधार पाऊसामुळे गावाजवळील साकळतोडी नदीत वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यांचे मृत्यूदेह मंगळवारी जवळपास १३ कि.मी. अंतरावर सापडले आहेत. सोमवारी धो- धो कोसळनाºया मुसळधार पावसामुळे नदी तुडुंब भरु न वाहु लागली त्यावेळी जाना शेताकडे गेला होता. तो पुरात वाहून गेल्याचे त्याचा पुतण्या, काकड बाबन उंबरसाडा याला समजलं. काका कुठे अडकला असेल तर वाचवू म्हणून काकाला शोधत असतांना तोही पुरात वाहून गेला.

टॅग्स :palgharपालघर