शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे दुग्ध व्यवसायावर परिणाम, मुंबईतील तबेल्यांनाही बसणार झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 23:02 IST

भाताची पावळी भिजल्याने गवत व्यापारी संकटात : मुंबईतील तबेल्यांनाही बसणार झळ

अनिरुद्ध पाटील

डहाणू/बोर्डी : परतीच्या पावसामुळे भात शेतीचे नुकसान झाले असून शेती आणि शेतीपूरक व्यवसायावरही त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. दरम्यान, भाताची पावळी भिजल्याने डहाणूच्या चिकू वाडीतील दुग्ध व्यवसाय आणि मुंबईतील तबेल्यांनाही त्याचा फटका बसणार आहे.

डहाणू तालुक्यात सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपातील भात पीक घेतले जाते. गेल्या आठवड्यात परतीचा पाऊस झाल्यानंतर हळवे, गरवे आणि निमगरवे या तिन्ही प्रकारच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. ज्याप्रमाणे भाताच्या दाण्यांचे नुकसान झाले तसाच फटका पावळीलाही बसला आहे. भिजलेल्या पावळीला बुरशीचा प्रादुर्भाव होऊन ते काळपट पडून दीर्घकाळ साठवण्यास अयोग्य ठरतात. त्यामुळे पावळी शेतकरी आणि गवत व्यापाऱ्यांना योग्य दर मिळणार नाही. शिवाय त्याचा थेट प्रभाव दुग्ध व्यवसायावरही होणार आहे. ही ओली पावळी खाण्यास गाई -म्हशी नापसंती दाखवत असल्याने दुधाचे प्रमाण घटते. त्यांच्यात पचनक्रि येसंदर्भातील पोटाचे विकार बळावतात. काही दिवसांपासून ओली पावळी खाल्ल्याने शेण पातळ झाले असून दुधातही घट जाणवत असल्याची माहिती स्थानिक दुग्ध व्यावसायिकांनी दिली.डहाणू तालुक्यात सुमारे पाच हजार हेक्टरवर चिकू फळ बागांचे क्षेत्र आहे. मुबलक पाणी, पावळीच्या माध्यमातून मिळणारा सुका चारा तसेच बागायतीसह भाजीपाला लागवडीमुळे दुग्ध व्यवसायासाठी आवश्यक ओला चारा उपलब्ध होतो. त्यामुळे गुजरात राज्यातील दुग्ध व्यावसायिक चिकू वाडीत येऊन हा व्यवसाय करतात. त्या बदल्यात बागायतदारांना शेण दिले जाते. जनावरांसाठी गोठा, पाणी, वीज आदी सुविधा उपलब्ध केल्याच्या बदल्यात शेणविक्रीद्वारे त्यांना चांगला फायदा मिळतो. शिवाय बागायतीला खताचा मुबलक पुरवठा होतो. त्यामुळे काही दशकांपासून चिकू वाडीतील दुग्ध व्यवसाय भरभराटीला आला आहे.दरम्यान, डहाणू आणि तलासरी तालुक्यात भात शेती कसण्याला सामाजिक प्रतिष्ठेतून पाहिले जाते. त्यामुळे अल्प, अत्यल्प भूधारक, बागायतदार किंवा नोकरी, व्यवसाय करणारे सर्वच समाजघटक भात शेती करतात. त्याद्वारे मोठ्या प्रमाणात पावळी आणि गवताचा व्यवसाय केला जातो. या पेंढ्यांना मशीनद्वारे प्रेस करून त्यांचे बंडल बांधून निर्यात केले जाते. वसई, ठाणे, मुंबई येथील तबेल्यांची सुक्या चाºयाची भिस्त डहाणूसह जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गवत व्यापारावर अवलंबून आहे. अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाल्याने यंदा मात्र दुग्ध व्यवसायावरही त्याचा परिणाम होईल.स्थानिकांना रोजगारच्दुभत्या जनावरांना ओला आणि सुका चारा आवश्यक असतो. फक्त ओला चारा खाल्यास त्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण कमी होऊन दुधात घट होते. एक म्हैस प्रतिदिन ५ किलो सुका चारा म्हणून पावळी खाते. क्षमतेनुसार १२ ते १८ ली. दूध देते. चिकू वाडीत ओला आणि सुका चारा वर्षभर मुबलक मिळतो. याकरिता गुजरातराज्यातील दुग्ध व्यावसायिक याला प्राधान्य देतात.च्गुजरात, ठाणे, मुंबई येथे गवत निर्यातीद्वारे शेतकऱ्यांना पावळीला प्रती किलो किमान ३ रु. भाव मिळतो. एप्रिल ते मे या काळात गतवर्षी तो १५ रुपये झाला होता. भात पिकाचा एकूण उत्पादन खर्च कमी करण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा आहे तर शेतीसह गवत व्यवसाय केल्याने ती परवडणारी ठरते. तसेच स्थानिक आदिवासींना रोजगार उपलब्ध होतो.परतीच्या पावसाने ओली झालेली पावळी दुभती जनावरे कमी प्रमाणात खातात. त्यामुळे दुधात घट झाली. त्यांच्या पचनप्रक्रि येत बिघाड होऊन शेण पातळ झाले. माझ्याकडे १४ म्हशी आणि ३ गाई आहेत. त्यांच्यापासून प्रतिदिन सरासरी १२० लीटर दूध मिळते. ओली पावळी खाल्याने रोज चार लिटर दूध कमी झाले असून त्याची आर्थिक झळ व्यवसायाला बसत आहे.- अमृत रबारी, गुजरातहून येऊन, बोर्डीतील चिकू वाडीत दुग्ध व्यवसाय करणारा

टॅग्स :Vasai Virarवसई विरार