मुंबईच्या तलावात पावसाने खाते उघडले
By Admin | Updated: July 4, 2014 03:26 IST2014-07-04T01:59:17+5:302014-07-04T03:26:20+5:30
मुंबईला झोडपून काढणाऱ्या मुसळधार पावसाने तलाव क्षेत्रात अद्याप जोर धरलेला नाही़ विहार व तुळशी तलाव वगळता मुंबईबाहेरील प्रमुख तलावांमध्ये मात्र नाममात्र सरी बरसल्या़
_ns.jpg)
मुंबईच्या तलावात पावसाने खाते उघडले
मुंबई : मुंबईला झोडपून काढणाऱ्या मुसळधार पावसाने तलाव क्षेत्रात अद्याप जोर धरलेला नाही़ विहार व तुळशी तलाव वगळता मुंबईबाहेरील प्रमुख तलावांमध्ये मात्र नाममात्र सरी बरसल्या़ परंतु पावसाळी ढग तलाव परिसरात सक्रिय असल्याने आशा कायम आहे़
तलाव क्षेत्राची पातळी खालावल्यामुळे पालिकेने बुधवारपासून २० टक्के पाणीकपात लागू केली आहे़ तलावांमधील पाण्याच्या पातळीत समाधानकारक वाढ होईपर्यंत ही कपात कायम राहणार आहे़ मात्र मुंबईत जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने तलाव क्षेत्रावर कृपादृष्टी दाखविलेली नाही़ त्यामुळे मुंबईत पाणीप्रश्न अद्यापही चिंताजनक आहे़ (प्रतिनिधी)