शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात मनसैनिकांचा राडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2021 2:24 AM

Eknath Shinde : वसई-विरार पालिका प्रशासनाने मंगळवारी परिवहन बसेसचे उद्घाटन, लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमाला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे व इतर नेते मंडळी हजर असताना, मनसैनिक आक्रमक झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वसई-विरार शहर महापालिका प्रशासन आयोजित परिवहन बसेसच्या लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिलेले राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात ‘पालिका आयुक्त आम्हाला वेळ द्या,’ असे ओरडत वसईतील मनसैनिकांनी घोषणाबाजी करीत राडा केला. या वेळी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वसई-विरार पालिका प्रशासनाने मंगळवारी परिवहन बसेसचे उद्घाटन, लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमाला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे व इतर नेते मंडळी हजर असताना, मनसैनिक आक्रमक झाले. त्यातील मनसेच्या दोघा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत राडा केला.पोलीस आणि शिवसैनिकांनी दोघा मनसे कार्यकर्त्यांना या वेळी चोप देत, कार्यक्रमातून बाहेर काढले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मनसे कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात नेले. परिवहन सेवेवरून बविआ-शिवसेना आमने-सामने उभी असताना, मध्येच मनसेने राडा करीत कार्यक्रमाला गालबोट लावले, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून या वेळी उमटली. 

वसई-विरार परिवहन सेवा सुरू करण्यावरून बहुजन विकास आघाडी व शिवसेनेचे राजकारण आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात परिवहन सेवा पूर्णपणे बंद होती. मात्र, दोन दिवसांपूर्वीच पालिका हद्दीत बविआने उद्घाटन करून बससेवा सुरू केली होती. आता हीच परिवहन सेवा आम्ही सुरू केली असल्याचा दावा करीत, या परिवहन सेवेचा लोकार्पण सोहळा वसई-विरार महापालिकेच्या वतीने मंगळवारी आयोजित केला होता. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMNSमनसे