पं. स.च्या लेट लतिफांवर कारवाई, बायोमेट्रीक पद्धत सुरु करण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 01:12 AM2019-05-07T01:12:39+5:302019-05-07T01:23:13+5:30

डहाणू पंचायत समितीच्या कारभारावर वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने पंचायत समितीचा कारभार राम भरोसर चालला आहे.

 Pt Action on Late Latifs, the need to start biometric method | पं. स.च्या लेट लतिफांवर कारवाई, बायोमेट्रीक पद्धत सुरु करण्याची गरज

पं. स.च्या लेट लतिफांवर कारवाई, बायोमेट्रीक पद्धत सुरु करण्याची गरज

Next

डहाणू : डहाणू पंचायत समितीच्या कारभारावर वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने पंचायत समितीचा कारभार राम भरोसर चालला आहे. डहाणू पंचायत समितीच्या अंतर्गत बंधकाम विभाग, कृषी विभाग ,पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभागात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारींच्या लेट लतिफांची संख्या वाढू लागली असून ११ वाजूनही अधिकारी येत नसल्याने नागरिकांची कामे रेंगाळत आहेत. तर बायोमॅट्रीक पद्धत सुरु करण्याची मागणी केलि जात आहे. डहाणू पंचायत समितीच्या बांधकाम विभागात शुक्र वारी ११ वाजूनही शुकशुकाट पाहायला मिळाला.

शाखा अभियंता साईडला गेले आहेत. रस्ते, मोर्या साकव, संरक्षण भिंत या कामावर शाखा अभियंता उपस्थित नसतात. याबाबत यापूर्वीही पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्र ार करण्यात आली होती. मात्र अधिकारी उशीरा कार्यालयात येत असल्याने त्याचेही नियंत्रण राहीले नसल्याचे चित्र आहे. मागे पंचायत समितीमध्ये बायोमॅट्रीक मशीन बसवण्यासाठी सीपीएमने मोर्चा काढला होता. मात्र त्यावरही कार्यवाही झालेली नाही. डहाणू तालुक्यातील दुर्गम भागातून लोक कामासाठी पंचायत समितीमध्ये येत असतात.मात्र साहेब आलेले नाहीत. मिटिंगमध्ये आहेत. व्हिझीटला गेले आहेत अशी कारणे सांगितली जातात. त्यामुळे लोकांची कामे रेंगाळतात.

पंचायत समितीच्या दस्तुरवखूद्द बांधकाम उपअभियंत्यांचे कारभारावर लक्ष नसल्याने ग्रामीण भागात कामाचा दर्जा घसरला आहे. रेतीच्या जागी ग्रीड वापरली जाते. ठेकेदार कामाची मापे आणून देतात ती पास केली जातात . मार्चमध्ये अर्धवट कामाची बिले काढण्यात येतात. शुक्र वारच्या या प्रजाराबद्दल जिल्हा परिषदेच व कार्यकारी अभियंता एस.एन.कुलकर्णी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. तरीदेखील पंचायत समतिी उपअभियंता एस.खराडे हे ११.५० वाजता पोचले. त्यामुळे दोन तास उशीरा येऊन वेळेवर घरी जाणाºया कर्मचाºयांना लग कोण लावणार असा प्रश्न आहे. या लेट लतिफांवर डहाणू पंचायत समिती काय भूमिका घेते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे..

प्रत्येक पंचायत समिती उपअभियंत्यांना दोन दिवस वर्र्किंगडे बाकीचे दिवस साईडवर गेलेले असतात.त्याबाबत सूचना देण्यात येतील.
- एस.एन. कुलकर्णी,
कार्यकारी
अभियंता पालघर

Web Title:  Pt Action on Late Latifs, the need to start biometric method

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.