शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

भक्तिमार्गातून लाभले आरोग्य धनसंपदेचे देणे, बावीस वर्षांपासूनचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 01:37 IST

तब्बल बावीस वर्षांपासून दर मंगळवारी महालक्ष्मी गडावर जाऊन दर्शन घेण्याचा उपक्र म डहाणूतील मंगलग्रुपतर्फे राबविण्यात येतो.

- अनिरुद्ध पाटीलडहाणू/बोर्डी : तब्बल बावीस वर्षांपासून दर मंगळवारी महालक्ष्मी गडावर जाऊन दर्शन घेण्याचा उपक्र म डहाणूतील मंगलग्रुपतर्फे राबविण्यात येतो. या गडावरील ८५० पायऱ्यांची चढउतार केल्याने व्यायाम होऊन उत्तम आरोग्य धनसंपदेचा आशीर्वाद लाभल्याची भावना या ग्रुप सदस्यांनी व्यक्त केली आहे. याचबरोबर गडाची स्वछता आणि परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्यांच्याकडून राबवला जातो.डहाणू रोडपासून महालक्ष्मी गडाच्या पायथ्याशी वधणा येथे पोहचण्याकरिता १८ कि.मी.चे अंतर असून याकरिता तालुक्यातील विविध भागातून ग्रुप सदस्य मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता येथे दाखल होतात. तेथून एक किलोमीटर पायी चालल्यानंतर पायºया सुरू होतात. ८५० पायऱ्यांच्या चढाईनंतर साधारणत: पाऊण तासांनी माथ्यावरील मंदिरात पोहचता येते. तेथे अभिषेक आणि आरतीचा कार्यक्र म आटपून हा ग्रुप माघारी परततो.२२ वर्षांपूर्वी शहरातील सरावली येथे राहणाºया अशोक राजपूत यांनी महालक्ष्मी भक्तांना एकत्र करून हा पायंडा पाडला. दर मंगळवारी हा उपक्र म राबविला जात असल्याने ग्रुपचे नामकरण मंगलग्रुप करण्यात आले. हा ग्रुप लवकरच दोन तपांचा टप्पा गाठणार आहे. या कालावधीत अनेक नवीन सदस्य ग्रुपशी जोडले गेले, तर काही कमी झाले. मात्र या भक्ती मार्गातून सुरू झालेल्या प्रवासात ध्यान साधना तसेच संघटनेचे महत्त्व त्यांना उमगले असून त्यांना सामाजिक भानही आले आहे. त्यातूनच गड परिसरात स्वछता, वृक्षारोपण आदी उपक्रम त्यांच्याकडून राबविले जात आहेत. शिवाय चढाई करताना १७०० पायºयांच्या चढ-उताराने व्यायाम होऊन उत्तम आरोग्याचे देणं त्यांना लाभले आहे.दरम्यान, प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला सुद्धा हे भक्त दर्शनाला जातात. शिवाय श्रावणी सोमवारी रात्री साडेआठ वाजता हे सदस्य गडावर जाऊन अभिषेक आणि भजन कीर्तनाचा कार्यक्र म मध्यरात्रीपर्यंत करून तेथेच वस्तीला राहतात. त्यानंतर मंगळवारी पहाटे काकड आरतीनंतर घराकडे मार्गस्थ होतात. तर अश्विन महिन्यात येणाºया नवरात्रीला प्रत्येक दिवशी पहाटे गडावर जाताना, अन्य नागरिकही त्यांच्यासोबत सहभागी होतात.महालक्ष्मी माता हे जागृत देवस्थान असल्याची श्रद्धा आहे. २२ वर्षांपासून गडावर दर्शनाला जाताना भक्तीच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्ती सदस्यांना लाभली आहे. शिवाय स्वच्छता आणि वृक्षारोपण या उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक भान वाढीस लागले. त्याचा फायदा प्रत्येक सदस्याच्या व्यक्तिमत्वातून जाणवत आहे. जास्तीत-जास्त नागरिकांनी हा आरोग्यदायक भक्तीमार्ग अवलंबवयास हवा. - अशोक राजपूत, संस्थापक, मंगल ग्रुप

टॅग्स :Vasai Virarवसई विरार