शहरं
Join us  
Trending Stories
1
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
2
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
3
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
4
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
5
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
6
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
7
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
8
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
9
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
10
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
11
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
12
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
13
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
14
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
15
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
16
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
17
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
18
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
19
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
20
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले

दीडशे रिसाॅर्ट बंद ठेवून वाढवण बंदराचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 00:00 IST

वसई तालुक्यातील व्यावसायिकांचा पाठिंबा

पालघर : वाढवण बंदरविरोधाची धग आता वेगाने पालघर जिल्ह्यासह मुंबईच्या दिशेने पसरू लागली आहे. कफपरेड, मढ येथील मासळी मार्केट बंद ठेवण्यात येऊन वसई तालुक्यातील १५० रिसॉर्टधारकांनी या बंदच्या हाकेला समर्थन देण्यासाठी आपली सर्व रिसॉर्ट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.वाढवण बंदराविरोधातील लढ्याने आता व्यापक स्वरूप प्राप्त केले आहे. डहाणू झाई-बोर्डी ते कफपरेड दरम्यानच्या सर्व मच्छीमार सहकारी संस्थांनी मासे खरेदी-विक्री, डिझेल-विक्री बंद ठेवली आहे. तर सर्व मासळी बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट, हॉटेल्सची उभारणी करण्यात आली आहे. अर्नाळा येथील ७०, कळंबमधील ६०, नवापूर-रानगाव २६ असे सुमारे १५० च्या वर रिसॉर्ट वाढवण बंदराला विरोध दर्शविण्यासाठी बंद ठेवण्यात आल्याचे कळंब रिसॉर्ट पर्यटन संघटनेचे अध्यक्ष धीरज निजाई यांनी ‘लोकमत’ला सांगितले. वाढवण बंदराच्या उभारणीमुळे आमच्या मच्छीमार बांधवांच्या व्यवसायासोबतच त्यांची घरे संकटात सापडणार असल्याने त्यांच्या सोबत आहोत, हा संदेश देण्यासाठी आम्ही सर्व रिसॉर्ट बंद ठेवल्याचे निजाई यांनी ‘लोकमत’ला सांगितले.