यादवनगरमधील नाल्याजवळ संरक्षण भिंत

By Admin | Updated: January 26, 2015 00:28 IST2015-01-26T00:26:09+5:302015-01-26T00:28:36+5:30

औद्योगिक वसाहतीमधील इंदिरानगरप्रमाणे यादवनगरमधील नाल्याजवळही संरक्षण भिंत बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे

Protective wall near Nala at Yavainagar | यादवनगरमधील नाल्याजवळ संरक्षण भिंत

यादवनगरमधील नाल्याजवळ संरक्षण भिंत

नवी मुंबई : औद्योगिक वसाहतीमधील इंदिरानगरप्रमाणे यादवनगरमधील नाल्याजवळही संरक्षण भिंत बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यामुळे पावसाळ्यात नागरी वस्तीमध्ये पाणी शिरण्याचा प्रकार बंद होणार असून नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. सदर ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यासाठी ५५ लाख २३ हजार रुपये खर्च होणार असून पुढील चार महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. संरक्षण भिंत नसल्याने दोन्ही बाजूची जमीन खचत आहे. पावसाळ्यात नागरी वस्तीमध्ये पाणी घुसत असते. यामुळे या ठिकाणी खासदार निधीतून संरक्षण भिंत बांधण्यात येईल.

Web Title: Protective wall near Nala at Yavainagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.