शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणांना पालिकेचे संरक्षण कायम? मीरा - भाईंदर महापालिकेच्या जागेतील बेकायदा गोदामे, झोपड्या जैसे थे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 07:39 IST

भाईंदर पूर्वेच्या आझादनगर भागातील पालिका आरक्षणाची जागा ही शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मोक्याची आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : भाईंदर पूर्वेच्या आझादनगर भागातील मीरा-भाईंदर महापालिकेच्या आरक्षणाच्या मालकी जागेत झालेल्या बेकायदा गोदाम व झोपड्यांना महापालिकेनेच संरक्षण दिल्याने बुधवारी भीषण आग लागून एकाचा बळी गेला. याप्रकरणी पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे. दुसरीकडे आगीची घटना घडूनही पालिका मात्र जागा अतिक्रमणमुक्त करण्यास पालिका अजूनही चालढकल करीत आहे. 

भाईंदर पूर्वेच्या आझादनगर भागातील पालिका आरक्षणाची जागा ही शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मोक्याची आहे. आरक्षणाची जागा ताब्यात घेण्यासाठी पालिकेने विकासक व जमीनमालकांना कोट्यवधी रुपयांचा मोबदला ‘टीडीआर’द्वारे दिलेला आहे, तर एका प्रकरणात अतिक्रमण असूनसुद्धा एका राजकीय व्यक्तीशी संबंधिताला पालिकेने ‘टीडीआर’ देण्याचा प्रताप केला असल्याचे आरोप होत आले आहेत. येथील एक पक्के मोठे अनधिकृत धार्मिक स्थळ तोडू नये, म्हणून संबंधित मुंबई उच्च न्यायालयात गेले असता, तेथे त्यांना दिलासा मिळाला नाही; परंतु पालिकेने अजूनही ते बेकायदा बांधकाम तोडलेले नाही.

‘न्यू गोल्डन नेस्ट’कडे जाणाऱ्या रस्त्यालगत या पालिका भूखंडात मोठ्या प्रमाणात गोदामे, झोपड्या; तसेच पक्की बांधकामे होऊनही महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांपासून अतिक्रमणाचे वरिष्ठ अधिकारी यांनी ही जागा मोकळी करून घेतली नाही. याप्रकरणी तत्कालीन स्थानिक शिवसेना नगरसेविका तारा घरत, स्नेहा पांडे आदींनी पालिकेकडे आरक्षणाची जागा मोकळी करण्यासाठी तक्रारी केल्या होत्या.  दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या मोकळ्या भागात   घरत, पांडे या स्थानिक नगरसेविकांनी वृक्षारोपण केले होते; परंतु काही काळाने झाडे काढून टाकून माफियांनी पुन्हा अतिक्रमणे केली. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक