यंदाही गोविंदाला अपघात विम्याचे संरक्षण

By Admin | Updated: August 25, 2015 23:09 IST2015-08-25T23:09:56+5:302015-08-25T23:09:56+5:30

दरवर्षीप्रमाणे यंदाही महानगरपालिकेने आपल्या हद्दीतील गोविंदांचा अपघाती विमा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे साडेसहा हजार गोविंदांचा तात्पुरता अपघाती विमा उतरवण्याकरीता

Protection of Accident Insurance at Govinda this year | यंदाही गोविंदाला अपघात विम्याचे संरक्षण

यंदाही गोविंदाला अपघात विम्याचे संरक्षण

वसई : दरवर्षीप्रमाणे यंदाही महानगरपालिकेने आपल्या हद्दीतील गोविंदांचा अपघाती विमा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे साडेसहा हजार गोविंदांचा तात्पुरता अपघाती विमा उतरवण्याकरीता महापालिकेला सुमारे सव्वादोन लाख रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे.
नुकत्याच झालेल्या महासभेमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ११० गोविंदा पथके आहेत. त्यामध्ये सुमारे साडेसहा हजार गोविंदांचा समावेश आहे. गेल्या २ वर्षापासून महानगरपालिका या गोविंदांचा तात्पुरता अपघाती विमा उतरवत असते. हा अपघाती विमा उतरवण्यापूर्वी दहीहंडी फोडताना अनेक गोविंदा जखमी झाले. त्यावर उपचार करणे त्यांच्या कुटुंबीयांना शक्य होत नाही हे लक्षात घेऊन ही योजना सुरू केली आहे. वसईमध्ये तरूणांसमवेत तरूणींचेही गोविंदा पथक आहे. महानगरपालिकेच्या या निर्णयाचे अनेक गोविंदा पथकाकडून स्वागत करण्यात आले आहे.

Web Title: Protection of Accident Insurance at Govinda this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.