बोगस पदव्यांच्या आधारे पदोन्नती
By Admin | Updated: April 6, 2016 01:54 IST2016-04-06T01:54:33+5:302016-04-06T01:54:33+5:30
पदोन्नतीसाठी बीएडची पदवी बंधनकारक असताना पालघर जिल्हा परिषदेच्या शाळेतील तब्बल १३४ शिक्षकांनी बीपीएड या शारिरिक शिक्षणाच्या सुट्टीकालीन

बोगस पदव्यांच्या आधारे पदोन्नती
शशी करपे, वसई
पदोन्नतीसाठी बीएडची पदवी बंधनकारक असताना पालघर जिल्हा परिषदेच्या शाळेतील तब्बल १३४ शिक्षकांनी बीपीएड या शारिरिक शिक्षणाच्या सुट्टीकालीन अर्धवेळ अभ्यासक्रमाच्या पदव्या मिळवून त्या आधारे पदोन्नती मिळवल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी आता वसईतील जिल्हा परिषदेच्या १३४ शिक्षकांच्या पदव्यांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी वसई पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
वसई तालुक्यात जिल्हा परिषद शाळेचे ८८४ शिक्षक असून त्यांच्याकडे डीएड पदव्या आहेत. पदोन्नतीसाठी बीएड पदवी बंधनकारक करण्यात आलेली आहे. १९९५ पासून सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत बीएड पास उमेदवारांनाच केंद्र प्रमुखपद दिले जात आहे. तसेच पाचवी ते सातवी पर्यंतसाठी बीएड पदवीधारकांची शिक्षक म्हणून नियुक्ती केली जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत आता बीएड धारकांनाच नोकरी मिळू लागली आहे. मात्र, जुन्या शिक्षकांनी पदोन्नती साठी बीएड करण्याऐवजी बीपीएड ही पदवी मिळवल्याचे उजेडात आले आहे. वसई तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १३४ शिक्षकांना गेल्या दोन तीन वर्षांपासून पदोन्नती देण्यात आली असून त्यांच्या वेतनश्रेणीतही वाढ झाली आहे. मात्र, पदोन्नतीसाठी ज्या पदव्या मिळवण्यात आल्या आहेत त्या पदव्यांना मान्यता नसल्याची तक्रार वसई भाजपा अध्यक्ष मारुती घुटुकडे यांनी केल्यानंतर बोगस पदव्यांचा घोटाळा उजेडात आला आहे.