न्याहाडी प्राथमिक उपआरोग्य केंद्रात एक वर्षापासून डॉक्टर नाही!

By Admin | Updated: August 22, 2015 22:18 IST2015-08-22T22:18:30+5:302015-08-22T22:18:30+5:30

मुरबाड तालुक्यातील आदिवासी भागातील न्याहाडी प्राथमिक उपकेंद्रामध्ये एक वर्षापासून डॉक्टर नसल्याने शिपाई औषध देत आहे. यागावाची लोकसंख्या आठ हजारांच्या

Priyadarshi primary healthcare center has not been a doctor for a year! | न्याहाडी प्राथमिक उपआरोग्य केंद्रात एक वर्षापासून डॉक्टर नाही!

न्याहाडी प्राथमिक उपआरोग्य केंद्रात एक वर्षापासून डॉक्टर नाही!

शिरोशी - मुरबाड तालुक्यातील आदिवासी भागातील न्याहाडी प्राथमिक उपकेंद्रामध्ये एक वर्षापासून डॉक्टर नसल्याने शिपाई औषध देत आहे. यागावाची लोकसंख्या आठ हजारांच्या आसपास असल्याने येथील आरोग्याचा प्रश्न गंभिर बनला आहे.
गेल्या एक वर्षापासून न्याहाडी प्राथमिक उपआरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने येथील आदिवासी रु ग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. येथील शिपाई मधुकर गायकर हेच दवाखाना उघडून बसतात. तसेच आलेल्या रुग्णांना थंडी, खोकला यांची औषधे देतात. मात्र, आदिवासी भाग असल्याने साप, विंचू किंवा कुत्रा चावल्यास तेथील रु ग्णांना १५ ते २० किमी शिरोशी किंवा टोकावडे या गावांमध्ये असलेल्या रु ग्णालयात उपचारासाठी जावे लागते. रात्रीच्या वेळेला येथे ये-जा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे वाहन नसते. त्यामुळे कधीकधी रु ग्ण रस्त्यामध्ये दगावल्याच्या घटना घडल्या आहेत, अशी माहिती ग्रामसेवक विलास देशमुख यांनी लोकमतला दिली.

Web Title: Priyadarshi primary healthcare center has not been a doctor for a year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.