रेतीमाफियांवर छापा

By Admin | Updated: August 22, 2015 22:17 IST2015-08-22T22:17:37+5:302015-08-22T22:17:37+5:30

गुजरातहून डहाणूत बेकायदेशीर रेतीपुरवठा करणाऱ्या रेतीमाफियांविरोधात तहसीलदारांनी कठोर कारवाई सुरू केल्याने रेतीचोरांनी आपला मोर्चा आता खाडीकिनारी वळविला आहे.

Print on the waist | रेतीमाफियांवर छापा

रेतीमाफियांवर छापा

डहाणू : गुजरातहून डहाणूत बेकायदेशीर रेतीपुरवठा करणाऱ्या रेतीमाफियांविरोधात तहसीलदारांनी कठोर कारवाई सुरू केल्याने रेतीचोरांनी आपला मोर्चा आता खाडीकिनारी वळविला आहे. त्यामुळे डहाणूच्या तहसीलदार प्रीतिलता कौंथी यांनी शुक्रवारी डहाणू, आगवन, तलावपाडा, मोठापाडा या भागातील खाडीकिनारी अचानक छापा टाकून तेथील सुमारे आठ ते दहा ब्रास रेती जप्त केली.
डहाणू महसूल प्रशासन तसेच डहाणू, घोलवड, कासा, वानगाव पोलिसांनी गुजरात येथील रेती अवैधरीत्या डहाणूत आणून विक्री करणाऱ्यांविरोधात गेल्या एक महिन्यापासून कडक कारवाई सुरू केल्याने रेतीचोराने आता डहाणूच्या समुद्रकिनारी तसेच सायवन भागातील खाडीकिनारी रेतीउपसा सुरू केला आहे. तहसीलदारांनी तेथील अवैध रेतीचा साठा जप्त करून आशागड पोलीस ठाण्यात रवानगी केली. तर, डहाणू पोलिसांनी आशागड येथील एक ट्रक रेती जप्त केली. महसूल विभागाने त्यास एक लाखाचा दंड केला. तर, कासा भागातील सर्कल अधिकारी व तलाठ्यांच्या एका पथकाने घोळ टोलनाक्यावर गुजरातहून मुंबईकडे जाणारा एक कंटेनर पकडून कासा पोलिसांच्या ताब्यात दिला.
राजस्थानहून येणाऱ्या या कंटेनरमध्ये विशिष्ट प्रकारची रेती आढळून आली असून याबाबत चौकशीनंतरच निर्णय घेण्यात येईल, असे महसूल विभागाने सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Print on the waist