शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

सामूहिक बलात्कार प्रकरणात केस मागे घेण्यासाठी दबाव, माजी उपसरपंचांचा प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 07:10 IST

पीडितेच्या वडिलांना दाखवले पैशांचे आमिष

पालघर : माहीम येथील एका १५ वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्यावर नऊ नराधम तरुणांनी अठरा तास आळीपाळीने बलात्कार केल्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले असताना काही स्थानिक राजकीय नेत्यांनी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नीता पाडवी यांनी हे प्रयत्न उधळून लावले आहेत. माजी उपसरपंच असलेल्या व्यक्तीने काही हजार रुपयांचे आमिष पीडित मुलीच्या वडिलांना दाखवून ही केस मागे घेण्याबाबत धमकावल्यावर त्या पदाधिकाऱ्याला दिवसभर पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले.

पालघर तालुक्यातील माहीममध्ये घडलेल्या अश्लाघ्य प्रकरणाचे गंभीर पडसाद देशभर उमटले आहेत. या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे. पालघर पोलिसांनी या प्रकरणातील नवव्या आरोपीला अटक केली असून सर्व आरोपींना गुरुवारी पुन्हा एकदा पालघर न्यायालयात हजर केले जाणार आहे. हे आरोपी स्थानिक तरुण असल्याने त्यांना वाचविण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला जात आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशी एका माजी उपसरपंचाने पीडित मुलीच्या वडिलांना काही हजार रुपयांचे आमिष दाखवून धमकावल्याची माहिती समोर आली आहे. 

यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी पाडवी यांनी संबंधित उपसरपंचाला दिवसभर पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. पोलिसांवर वेगवेगळ्या पद्धतीने मोठा दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असतानाही पोलिसांनी पॉक्सो, अपहरण आदीसह आठ विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. 

या प्रकरणाची गंभीर दखल महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेत सुमोटो दाखल करण्याची मागणी केली आहे. यावेळी या प्रकाराने पालकांची जबाबदारी वाढल्याचे सांगून आपला मुलगा अथवा मुलगी कोणत्या मित्रांसोबत जातात, मोबाइलमध्ये काय बघतात, याकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. या नऊ नराधम तरुणांना कठोरातील कठोर शिक्षा सुनावण्याची मागणीही केली जात आहे.

ड्रगचे रॅकेट उद्ध्वस्त करण्याची मागणी एका निरागस अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा फायदा उचलत १८ तास तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रकार त्या तरुणांनी केला आहे. नराधमांनी मद्यपान करीत तिच्यावर अमानवी अत्याचार केले. ज्या भागात हा प्रकार घडला त्या भागात असे प्रकार नेहमीच घडत असल्याचे स्थानिक बोलत असून छुप्या पद्धतीने मद्यपान आणि ड्रगचे सेवन या भागात सर्रास केले जात होते, अशीही माहिती पुढे येत आहे. छोट्या-छोट्या गावातील स्थानिक तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ड्रग रॅकेटचा पोलिसांनी छडा लावून ते उद्ध्वस्त करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpalgharपालघर