शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

फेरीवाला समितीसाठी सत्ताधाऱ्यांचा दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 23:18 IST

आयुक्तांनी सांगून सुद्धा बहुमताच्या जोरावर महासभेत मंजूरी

भार्इंदर : महापौर डिम्पल मेहता यांच्या अध्यक्षतेखाली नवीन फेरीवाला समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव आयुक्त बालाजी खतगावकर यांनी सत्ताधाºयांच्या सूचनेनुसार गुरुवारच्या महासभेत आणला होता. मात्र, चार महिन्यांपूर्वी स्थापन केलेली समिती रद्द करता येत नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट करूनही सत्ताधाºयांनी ती रद्द करण्याचा ठराव बहुमताच्या जोरावर मंजूर केला.या समितीची स्थापना होण्यापूर्वी पालिकेने अनेकदा त्याची माहिती वर्तमानपत्रांसह पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती. तरीही, याची माहिती संबंधित विभागाने सत्ताधारी म्हणून आपल्याला दिली नसल्याचा आरोप करत स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील यांनी थेट विभागाच्या अधिकारी दीपाली पोवार यांच्यावरच कारवाईची मागणी केली. त्यामुळे स्थापन झालेली समिती रद्द करून महापौरांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती स्थापन करण्यावर आपण ठाम असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यावर, आयुक्तांनी स्थापन झालेली समिती रद्द करता येत नसल्याचे स्पष्ट करून त्यात आणखी इच्छुकांना कसे सामावून घेता येईल, यासाठी सरकारस्तरावर प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन सभागृहाला दिले. मात्र, त्यासाठी केवळ एका पक्षाने ठराव न मांडता सर्व पक्षांनी एकमताने निर्णय घेऊन तसा ठराव मांडण्याचे आवाहन सभागृहाला केले. परंतु, सत्ताधारी ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने नवीन समिती स्थापन करण्याचा ठराव मांडला.हा प्रस्ताव महासभेचा अधिकार नसतानाही मांडल्याबाबत काँग्रेसचे गटनेते जुबेर इनामदार यांनी स्थापन झालेली समिती कायदेशीर आहे का, अशी विचारणा आयुक्तांना केली. त्याला आयुक्तांनी होकार दिला. इनामदार यांनी विद्यमान समितीला विरोधकांची मान्यता असल्याचा ठराव मांडला.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकhawkersफेरीवालेmira roadमीरा रोडbhayandarभाइंदर