शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी बांधवांची आगोटाची तयारी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 00:04 IST

संडे अँकर । बाजारपेठेत प्लास्टिक व दोर, पावसाळ्याच्या शिधाखरेदीसाठी ग्राहकांची गर्दी, घरांची दुरुस्ती

जव्हार : जव्हार हा ९९ टक्के आदिवासी लोकवस्ती असलेला तालुका असून, दिड लाख लोकसंख्या आहे. खेडोपाड्यातील बहुतांश घरे कुडा विटामातीची असल्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही घरावर टाकण्यासाठी, गाय-गोठ्यासाठी, पावसाळ्यात चुलीसाठी लागणाऱ्या लाकूड साठा, प्लास्टीक किंवा ताडपत्री खरेदीसाठी जव्हारमध्ये सध्या जोरदार गर्दी होते आहे. तसेच येथील आदिवासी बांधव घरावरील कौलांची दुरुस्ती करतांना दिसत आहेत.

उन्हाचे चटके इतके जोरात बसू लागले आहेत की, आता पाऊस लवकरच होणार अशी चाहूल लागली असल्याने, जव्हार येथे बाजारपेठेत घरावरील कौलांवर अंथरण्यासाठी, लाकडाच्या झोपडीवर कुडाच्या घरावर तसेच गायगोठ्यांच्या अवती-भवती बांधण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टीक कापड लागते ते जव्हारच्या बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे. परिसरांतील आदिवासी बांधव पावसाळ्यांत पाण्याची गळती घरात होऊ नये म्हणून खुप मोठ्या प्रमाणात प्लास्टीक कापडाची खरेदी करतांना दिसत आहेत. प्लासटीकमध्ये काळे प्लास्टीक हे सर्वात स्वस्त ६५/- ते ८५/- रुपये प्रति किलो आहे. त्याचा पन्हा (रूंदी) १५ ते २० फुटाचा असतो, निळे, पिवळे किंवा पांढºया कलरचे देखील प्लास्टीक बाजारपेठेत मिळते. तसेच प्लास्टीकच्या घोंगड्याचेही चलन येथे मोठ्या प्रमाणात आहे. घोंगड्यांच्या उपयोग भर पावसांत शेतात लावणी करतेवेळी होत असतो. शिवाय निळ्या रंगाच्या प्लास्टीक ताडपत्र्या मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जातात. निळी ताडपत्री ही जाड असल्यामुळे टिकाऊ असते, यात ४ फुटी. ६ फुटी, ८ फुटी, १२ फुटी पन्हा असतो. या ताडपत्र्या मिटरमध्ये विकल्या जात आहेत. जव्हार प्लास्टीक कापडाच्या आणि छत्र्यांच्या बाबतीत मोठी बाजारपेठ असून येथे पावसाळ्याच्या सुरवातीला म्हणेज फेब्रुवारी मार्चपासून मोठे व्यापारी लाखो टन प्लास्टीक कापडाची खरेदी करून साठा करून ठेवतात व त्यांची सिझनला विक्री होत असते. घाऊक स्वरूपाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाºया जव्हार मधुन आसपासच्या तालुक्यांतील, खेडोपाड्यातील व्यापारी प्लास्टीक कापड व छत्र्यांची खरेदी करीत असतात.कडाक्याचा उन्हाळा व शाळेच्या सुट्ट्या आता अंतिम टप्प्यांत असून असह्य उन्हाबरोबरच हव्याशा वाटणाºया शालेय सुट्ट्या देखील आता लवकरच संपणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक या सर्वांना शाळेचे वेध लागले आहे. सध्या विद्यार्थी जगतात दप्तर, पुस्तके, नवीन शाळेचे गणवेश, शालेय साहित्य, बुट, रेनकोट, छत्र्यां या सारख्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत हालचाली सुरू झाल्या आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर