गावदेवीमातेच्या उत्सवाची चिंचघर येथे जय्यत तयारी
By Admin | Updated: March 28, 2016 02:23 IST2016-03-28T02:23:50+5:302016-03-28T02:23:50+5:30
गावात एकोपा निर्माण व्हावा यासाठी वर्षातून एकदा गावदेवी मातेचा साजरा केला जातो हे उत्सवाचे तिसरे वर्षे आहे. शनिवारी २ ते मंगळवार ५ एप्रिलपर्यंत उत्सव समितीच्यावतीने

गावदेवीमातेच्या उत्सवाची चिंचघर येथे जय्यत तयारी
वाडा : गावात एकोपा निर्माण व्हावा यासाठी वर्षातून एकदा गावदेवी मातेचा साजरा केला जातो हे उत्सवाचे तिसरे वर्षे आहे. शनिवारी २ ते मंगळवार ५ एप्रिलपर्यंत उत्सव समितीच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उत्सवाचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी खासदार कपिल पाटील, आमदार शांताराम मोरे, तहसीलदार डॉ. संदीप चव्हाण, पोलीस निरीक्षक संजय हजारे, सभापती अरूण गौंड, उपसभापती नंदकुमार पाटील, जिप सदस्या धनश्री चौधरी, पं.स. सदस्या मेघना पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
चार दिवस चालणाऱ्या या उत्सवात शनिवार सकाळी देवीचे पूजन संध्याकाळी ४ पालघर जिल्हा स्तरीय कबड्डी सामन्याचे उद्घाटन सवरा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. रविवारी सकाळी पूजा आणि अग्निस्थापना दुपारी ३ वाजता महिलांसाठी संगीत खुर्ची रात्री ९ वाजता वासुदेव महाराज आर्विकर यांचे कीर्तन सोमवार सकाळी देवता पूजन दुपारी दोन वाजता महिलांसाठी हळदी-कुंकू सायंकाळी ४ वाजता शोभायात्रा व रात्री ९ वाजता डबलबारी भजनाचा जंगी सामना, मंगळवारी सकाळी ९ ते ११ मारेश्वर महाराज एकसाल यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसाद होईल. या उत्सवात लहान मुलांसाठी पाळण्याची जत्रा भरविण्यात आली आहे. चार दिवस चालणाऱ्या या धार्मिक सोहळ््यास भाविकांनी उपस्थित राहून गावदेवी मातेचे दर्शन, भजन, कीर्तन, कबड्डी सामने आदी कार्यक्रमाचे लाभ घेऊन सहकार्य करावे असे आवाहन गावदेवी उत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.