पसंती तरुणाई अन् वयोवृद्धांनाही!

By Admin | Updated: October 21, 2014 04:46 IST2014-10-21T04:43:44+5:302014-10-21T04:46:41+5:30

तरुणांचा चेहरा म्हणजे मुंबई, अशी ओळख असलेल्या मुंबईकरांनी यंदाच्या निवडणुकीत एक अगदी तरुण व वयोवृद्ध लोकप्रतिनिधी निवडला आहे़

Pregnant youth and old age! | पसंती तरुणाई अन् वयोवृद्धांनाही!

पसंती तरुणाई अन् वयोवृद्धांनाही!

अमर मोहिते, मुंबई
तरुणांचा चेहरा म्हणजे मुंबई, अशी ओळख असलेल्या मुंबईकरांनी यंदाच्या निवडणुकीत एक अगदी तरुण व वयोवृद्ध लोकप्रतिनिधी निवडला आहे़ यातील योगायोगाची बाब म्हणजे हे दोन्ही उमेदवार भाजपाचेच आहेत़
अंधेरी पश्चिमेतून निवडून आलेले भाजपाचे अमित साटम हे ३८ वर्षांचे असून, मुलुंड मतदारसंघातून निवडून आलेले तारासिंग हे ७७ वर्षांचे आहेत़ तरुणांना संधी देण्यात मुंबईकरांनी कधी हात आखडता घेतला नाही़ याचे उदाहरण म्हणजे माजी खासदार मिलिंद देवरा, प्रिया दत्त हे बहुमताने निवडून आले होते़
यंदाची निवडणूक पंचरंगी असल्याने अनेक दिग्गजांची तर प्रतिष्ठेची लढाई होती़ त्यात अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसचे अशोक जाधव व शिवसेनेचे जयवंत परब हे दोन्ही तगडे उमेदवार होते़ हे दोन्ही उमेदवार वयासोबतच राजकरणातही अनुभवाने दांडगे होते़ तसेच युती तुटल्याने शिवसेनेने मतदारांना भावनिक आवाहन केले होते़
अमित साटम यांची ओळख म्हणजे माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे खाजगी सचिव व महापलिकेतील स्थायी समितीचे सदस्य, असे असतानाही या तरुणाला कौल दिला़ दुसरीकडे तारासिंग यांची ही चौथी निवडणूक होती़ त्यात त्यांचे वय ७७ आहे़ त्यामुळे या मतदारसंघाकडेही अवघ्या मुंबईचे लक्ष लागले होते़ पण विकासकामे व दांडग्या जनसंपर्काच्या आधारावर तारासिंग यांची यशस्वी घोडदौड मतदारांनी सुरूच ठेवली़
अखेर कोळंबकर हे जिंकले
गेली २५ वर्षे वडाळा मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांचा यंदाचा विजय हा थरारकच होता़ कारण अवघ्या काही मतांच्या फरकाने ते निवडून आले आहेत़ विशेष म्हणजे स्थानिक नसतानाही भाजपाचे उमेदवार मिहीर कोटेचा हे मतमोजणीत सुरुवातीला कोळंबकर यांच्यापेक्षा हजारो मतांनी आघाडीवर होते़ कोटेचा हे कोळंबकर यांना शह देतील, असे चित्र निर्माण झाले होते़ पण कोळंबकर हे विजयी झाले़

Web Title: Pregnant youth and old age!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.