शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
4
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
5
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
6
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
7
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
8
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
9
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
10
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
11
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
12
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
13
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
14
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
15
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
16
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
17
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
18
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
19
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
20
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!

वसईत उकाड्यात विजेचा लपंडाव, नागरिक हवालदिल, महावितरण कार्यालयातील फोन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 01:31 IST

लॉकडाउनमुळे आणि वाढत्या कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे लोकांना सध्या घरीच राहावे लागत आहे. त्यातच विजेचा लपंडाव सुरू झाल्यानंतर लोकांना होणारा त्रास असह्य करणारा आहे.

वसई : सर्वत्र कोरोनाचे संकट, लॉकडाऊन आणि त्यात मे महिन्याचा कडक उन्हाळा यामुळे आधीच लोक हैराण झालेले आहेत. त्यात दिवसापेक्षा रात्रीचा उकाडा असह्यहोत असताना वसई-विरार भागात विजेचा लपंडाव सुरू झालेला आहे. यामुळे भाबोळा, सुयोगनगरसह अनेक भागातील नागरिक विजेअभावी हवालदिल झाले आहेत.लॉकडाउनमुळे आणि वाढत्या कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे लोकांना सध्या घरीच राहावे लागत आहे. त्यातच विजेचा लपंडाव सुरू झाल्यानंतर लोकांना होणारा त्रास असह्य करणारा आहे. महावितरणच्या उमेळमान कार्यालयात लँडलाईन दूरध्वनी बंद, रात्री कार्यालय ओस आणि कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्तीच नाही. प्रभारी पदभार असलेले अभियंता व उपकार्यकारी अभियंता नॉट रिचेबल असतात, अशी स्थिती आहे. यामुळे संपर्काअभावी रात्री-अपरात्री वीज खंडित झाल्याची तक्रार नागरिकांनी नेमकी कुठे करायची, असाही प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.मागील दहा-बारा दिवसांपासून महावितरणच्या वसई अर्बन उपविभाग हद्दीत मोडणाऱ्या भाबोळा, सुयोगनगर, चुळणे आदी भागांतील वीज दिवसा अधूनमधून जाते ती वेगळीच, आता तर रात्री ११ नंतर विजेचा दाब कमी-जास्त होणे, प्रसंगी वीज खंडित होण्याचे प्रकार सतत घडत आहेत. सतत आलटून पालटून दोन फेज जातात. हे आता नित्याचेच झाले आहेत.गेले काही दिवस परिसरातील काही इमारतींत रात्रभर वीज खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. महापौर प्रवीण शेट्टी आणि स्थानिक नगरसेवक फ्रँक आपटे आदींशी याबाबत संपर्क केल्यावर सकाळी वीज पूर्ववत झाली, मात्र हे प्रकार रोजच होत असून रात्री वीज गेल्यावर थेट कार्यालय गाठून लाईनमनला बोलावून आणावे लागते, तर काही वेळाने पुन्हा वीज जाते. लाइनमनच्या मते येथील ओव्हरलोडमुळे कधी एक फेज तर कधी दुसरा फेज फेल होत असतो, तर वीज कंपनीच्या वरिष्ठांना संपर्क केला तर येथील कनिष्ठ अभियंता यांची बदली झाली आहे, तर वसई उपकार्यकारी अभियंता मोबाइल उचलत नाहीत, अशी परिस्थिती आहे.१०० टक्के वसुली, मग हा त्रास का?महावितरण कंपनीच्या स्टेला विभागात शेकडो इमारती असून येथील वीजग्राहक हा नियमित देयके भरणारा आहे. या भागातील वीजबिलवसुली जवळपास १०० टक्के आहे. मात्र, या बदल्यात अजूनही महावितरणने ठोस अशी दुरुस्ती केलेली नाही.उदाहरण द्यायचे झाले तर कुठे तारा तुटणे, विजेचा खांब पडणे, जम्पर तुटणे, ट्रान्सफॉर्मर, वीजगळती असे नानाविध प्रकार दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या वेळीही नित्याचे झाले आहेत. प्रसंगी विजेचा लपंडाव व कमीजास्त दाबामुळे ग्राहकांच्या किमती वस्तूंचे नुकसान होत आहे. यामुळे येथील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.कनिष्ठ अभियंता तत्काळ नियुक्त करावास्टेलास्थित उमेळमान विभागाच्या कार्यालयात स्थानिक तथा तज्ज्ञ कनिष्ठ अभियंत्यांची नेमणूक करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. आ. हितेंद्र ठाकूर आणि ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना ट्विटरवरून तक्रारी केल्या आहेत. स्टेला चुळणे भागात सातत्याने वीज खंडित होत आहे, आधीच लॉकडाऊन आहे, लोक त्रस्त आहेत आणि त्यात या वीज समस्येवर तोडगा निघत नाही व अधिकारीही लक्ष देत नाहीत. नागरिकांच्या तक्रारींची दखल वरिष्ठांकडून घेतली जात नाही. त्यामुळे आता नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रार करत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारmahavitaranमहावितरण