अनेक ठिकाणी भातशेतीला आले लोम
By Admin | Updated: October 1, 2015 01:31 IST2015-10-01T01:31:42+5:302015-10-01T01:31:42+5:30
तालुक्यात हळव्या जातीच्या भातपीकांचे लोम डोलु लागले असून काही भागातील शेतकऱ्यांची कामणीला सुरूवात झाली आहे.

अनेक ठिकाणी भातशेतीला आले लोम
विक्रमगड : तालुक्यात हळव्या जातीच्या भातपीकांचे लोम डोलु लागले असून काही भागातील शेतकऱ्यांची कामणीला सुरूवात झाली आहे.
हळव्या भातपीकाला साधारण ९० ते १०० तर गरव्या भातपीकाला ११० ते १२० दिवस लागतात. तालुक्यात जया, सुवर्णा, कर्जत, राशीपुनम, कोलम अशा विविध भातबियाणांची लागवड केली जाते. अनेक ठिकाणी भातशेतीला लोम लागले असून सद्यस्थितीत भाताची परिस्थिती चांगली असल्याचे मत शेतकरी घनश्याम आळशी यांनी सांगितले.
तालुक्यातील सरासरी पेक्षाही कमी पाऊस असतानाही भातशेती चांगली आहे. गरव्या भाताला अजुन १५ ते २० दिवसाच्या कालावधी बाकी आहे. परंतु भातशेती चांगली झालेली असलेली तरी सरासरी उत्पन्नात घट होण्याची भिती घनश्याम आळशी (शेतकरी) यांनी व्यक्त केली. भातशेती अजिबात परवडत नसून खर्चही सुटत नाही यासाठी चालुवर्षी भाताला २००० ते २२०० रू. भाव वाढवून देण्याचीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)