अंजलीच्या हत्येला पोलीसच जबाबदार’, संतप्त जमावाकडून आरोपांच्या फैरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:37 IST2018-03-27T00:37:35+5:302018-03-27T00:37:35+5:30
अंजलीच्या तपासात पोलिसांनी हलगर्जीपणा दाखवल्यानेच तिची हत्या झाली असून त्याला पोलीस जबाबदार असल्याचा आरो...

अंजलीच्या हत्येला पोलीसच जबाबदार’, संतप्त जमावाकडून आरोपांच्या फैरी
वसई : अंजलीच्या तपासात पोलिसांनी हलगर्जीपणा दाखवल्यानेच तिची हत्या झाली असून त्याला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप करीत संतप्त जमावाने सोमवारी संध्याकाळी तुळींज पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. यावेळी पोलिसांशी धक्काबुकीही करण्यात आली.
शनिवारी रात्री अंजलीचे अपहरण केल्याचे सीसीटीव्हीतील फुटेजमध्ये स्पष्ट होत असून तिला एक महिला पळवून नेताना दिसत आहे. त्यानंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब लावला. तसेच तपासातही हलगर्जीपणा केला. त्यामुळेच अंजलीची हत्या झाली असून त्याला पोलीसच जबाबदार असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी यावेळी केला.
पोलीस ठाण्यासमोर सोमवारी संध्याकाळी मोठा जमाव चालून आला होता त्यांनी पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे पोलिसांशी त्यांची धक्काबुकीही झाली. अंजलीच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात यावी आणि तपासात हलगर्जीपणा करणाºया संबंधित अधिकाºयावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.