विरारमध्ये पोलीस ‘रायझिंग डे’

By Admin | Updated: January 2, 2016 23:59 IST2016-01-02T23:59:37+5:302016-01-02T23:59:37+5:30

पोलीस व जनता यांनी एकजुटीने गुन्ह्यांना आळा घालावा या उद्देशाने घेऊन पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विरार पोलीस ठाण्याच्या माध्यमातून २ जानेवारी २०१६ ते ८ जानेवारी २०१६

Police 'Raising Day' in Virar | विरारमध्ये पोलीस ‘रायझिंग डे’

विरारमध्ये पोलीस ‘रायझिंग डे’

पारोळ : पोलीस व जनता यांनी एकजुटीने गुन्ह्यांना आळा घालावा या उद्देशाने घेऊन पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विरार पोलीस ठाण्याच्या माध्यमातून २ जानेवारी २०१६ ते ८ जानेवारी २०१६ च्या दरम्यान रायझींग डे चे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहमध्ये कायद्याचे प्रबोधन करणे, गुन्हासंबंधी माहीती देणे, पोलीस दैनंदिनी कामकाज नागरीकांसमोर मांडणे, शस्त्रप्रदर्शन भरवणे इ. कार्यक्रमाव्यतिरीक्त रक्तदान शिबीर, विविध खेळ, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे असे विरार निरिक्षक सुनील माने यांनी लोकमतला सांगितले.
आजच्या उद्घाटन सोहळ्यास पोलीस, पोलीसमित्र, ज्येष्ठ नागरीक, दक्षनागरीक, महिला दक्षता समिती व लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन भव्य रॅलीचे आयोजन केले होते. यामध्ये वसई उपविभागीय पोलीस निरिक्षक नरसिंह भोसले, श्रीकृष्ण कोकाटे, विरार पोलीस निरिक्षक सुनिल माने, उपमहापौर उमेश नाईक, नगरसेवक प्रशांत राऊत यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. (वार्ताहर)

Web Title: Police 'Raising Day' in Virar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.