शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

बिल्डरला वाचविण्यासाठी पोलिसांवर दबाव

By admin | Updated: March 20, 2017 01:49 IST

पालघर (पूर्व) च्या नगरपरिषद हद्दीतील वेवुर येथे उभारण्यात येणाऱ्या ‘पूनम लाईफ स्टाईल पार्क’ ह्या रहिवासी गृहसंकुलामध्ये

पालघर : पालघर (पूर्व) च्या नगरपरिषद हद्दीतील वेवुर येथे उभारण्यात येणाऱ्या ‘पूनम लाईफ स्टाईल पार्क’ ह्या रहिवासी गृहसंकुलामध्ये बुक केलेल्या घरांचे (फ्लॅटचे) पैसे गेल्या दोन वर्षांपूर्वीं भरूनही त्याचा मुदतीत ताबा देण्यास नकार देणाऱ्या सुमित जवाहरलाल जैन ह्या बिल्डरसह त्याच्या अन्य भागीदारांवर पालघर पोलिसांनी फसवणूकीचा आणि महाराष्ट्र ओनरशीप फ्लॅट अ‍ॅक्ट सेक्शन ८ प्रमाणे गुन्हा दाखल केला असला तरी ह्या प्रकरणातील आरोपीना अटक करू नये म्हणून पोलिसांवर व तक्रारदारांवर हितसंबंधियांकडून प्रचंड दबाव येतो आहे.आपले स्वप्नांतले घर विकत घेण्यासाठी दिवसरात्र मेहनत करून घाम गाळून जमा केलेली पुंजी, आणि कर्ज रूपाने जमा केलेल्या रक्कमेतून तक्रारदार तुकाराम विश्राम गार्डे रा. अंधेरी (मुंबई) व इतर २१ लोकांनी वेवुर येथील सर्व्हे न.६१/१,६६ पैकी ६७/१,व ६८ ह्या जागेवर उभारण्यात येणार्या पूनम पार्क ह्या रिहवासी संकुलात आपले फ्लॅट बुक केले होते.तक्र ारदार गार्डे ह्यांनी आपला वन बीएच के फ्लॅट ११ लाख ४४ हजार रु पयाला बुक करताना एकूण रक्कमे पैकी ८ लाख ८०० रु पयांची रक्कम हि भरली होती मात्र अजून बिल्डरांनी त्याला ताबा दिलेला नाही.पूनम पार्क या रहिवासी संकुलात बऱ्याच ग्राहकानी ७० ते ८० टक्क्यांहून अधिक पैसे या बिल्डरकडे जमा केले असतानाही त्या बदल्यात आजतागायत काम मात्र ५० ते ६० टक्केच झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे घरांचा ताबा त्यांना मिळू शकलेला नाही. तसेच या ताबा न मिळालेल्या घरांवर बिल्डरच्या संगनमताने इंडिया बुल्स ह्या गृह वित्तकंपनीमार्फत मोठे गृहकर्ज देण्यात आल्याचे माहितीच्या अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांवरून समजते. त्यामुळे व्याजाची रक्कम वाढत असून भाड्याच्या घराचे भाडे असा दुप्पट फटका ग्राहकांना बसत आहे. असे असूनही याउलट बिल्डर सुमित जैन आणि त्यांच्या प्रतिनिधींकडून पत्र पाठवून अवास्तव पैशाची मागणी ग्राहकांकडून केली जात असल्याचे व ते न भरल्यास फ्लॅट कॅन्सल करू असे धमकी वजा आशय असलेले पत्र त्यांना बजावली जात असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. ग्राहकांनी बिल्डरसोबत केलेल्या कारारनाम्याप्रमाणे फ्लॅट बुक केल्यानंतर सन २०१३ सालात आपल्या घरांचा ताबा मिळणे अपेक्षित होते. मात्र २०१७ साल उजाडुन तब्बल चार वर्षाचा कालावधी उपटून जाऊनही घरांचा ताबा मिळालेला नाही.(वार्ताहर)