शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

गणेश विसर्जनासाठी पोलीस, पालिका यंत्रणा झाली सज्ज; चोख बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 23:28 IST

स्टॉलवरील कारवाईबाबत चालढकल

मीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये अनंत चतुर्दशीच्या विसर्जनाची पोलीस आणि महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. ५०० पेक्षा जास्त पोलीस, तर १४० सार्वजनिक, तर १४०० खाजगी गणेशमूर्तींचे विसर्जन होईल, अशी पोलिसांची आकडेवारी आहे. विसर्जनमार्गावर तात्पुरते लावले जाणारे बेकायदा स्टॉल, मंडपांना आम्ही परवानगी दिलेली नसून रहदारीला अडथळा होत असेल, तर कारवाईची जबाबदारी पोलिसांची असल्याचे सांगून पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी पोलिसांच्या कोर्टात चेंडू ढकलला आहे. पोलिसांनी मात्र पालिकेने कारवाई करावी, असे पालिकेला कळवले आहे.

मीरा-भार्इंदरमध्ये महापालिकेने शहरात २२ ठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था केली आहे. त्यामध्ये शिवार उद्यान येथील एका कृत्रिम तलावाचाही समावेश आहे. खाडीकिनारे, तलाव व समुद्रकिनारी पालिकेने विद्युत रोषणाईसह मंडप, आरतीसाठी टेबलव्यवस्था तसेच विसर्जनासाठी ५८० कर्मचारी, बोट, तराफे, हायड्रॉलिक क्रेन, फॉर्क लिफ्ट आदींची व्यवस्था केली असल्याचे आयुक्त खतगावकर म्हणाले.विसर्जनमार्गावर लागणारे स्टॉल, मंडप, स्टेज, टेबल आदींसाठी आम्ही कुणालाच परवानगी दिलेली नाही. याचा रहदारीला अडथळा होत असेल वा यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अशा मंडप-स्टेजवर कारवाईची जबाबदारी पोलिसांची असल्याचे आयुक्त म्हणाले. पोलिसांनी सांगितले की, त्यांच्यासोबत मिळून पालिका कारवाई करेल, अशी पुस्तीही आयुक्तांनी जोडली.

दुसरीकडे, पोलीस उपअधीक्षक कार्यालय तसेच भार्इंदर पोलीस ठाणे आदींनी मात्र महापालिकेला पत्र देऊन विसर्जनमार्गावर अडथळा ठरणारे कोणत्याही प्रकारचे मंडप, स्टॉल आदी लावण्याची परवानगी देऊ नये, असे कळवतानाच पालिकेने कारवाई करावी, असे कळवले आहे. विसर्जनमार्ग आधीच अरुंद असताना त्यात लागणारे खाद्य-पेयाचे स्टॉल, स्वागत मंडप व स्टेज आदींमुळे गर्दी होऊन अगदी धक्काबुक्की व चेंगराचेंगरीही होते. उष्टं-खरकटं तसेच टाकून जात असल्याने दुसऱ्या दिवशी तर रस्त्यांचा उकिरडा झाला असतो. पोलीस दरवर्षी पालिकेला पत्र लिहून कळवत असतात. पण, पालिकेचे अशा स्टॉलधारकांशी तसेच राजकारण्यांशी असलेल्या अर्थपूर्ण संगनमतामुळे पालिका कारवाई करत नसल्याचा आरोप अ‍ॅड. सुशांत पाटील यांनी केला आहे.दरम्यान, विसर्जनासाठी शहरात ४७ पोलीस अधिकारी, ४४२ पोलीस कर्मचारी, १५० होमगार्ड यांच्याबरोबरच राज्य राखीव दलाची एक, तर दंगल नियंत्रण पथकाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. याशिवाय, वाहतूक पोलिसांसह एनसीसी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. सीसीटीव्ही लावण्यात आले असून विसर्जनादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे उपअधीक्षक शांताराम वळवी यांनी सांगितले.

टॅग्स :Policeपोलिस