निचऱ्यासाठी पोलिसांचा पुढाकार
By Admin | Updated: July 6, 2017 05:48 IST2017-07-06T05:48:42+5:302017-07-06T05:48:42+5:30
मुंबई-अहमदाबाद हायवेवर पाणी साचून राहत असल्याने वाहन कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. यावर उपाय करण्यासाठी

निचऱ्यासाठी पोलिसांचा पुढाकार
अनिरुद्ध पाटील/लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : मुंबई-अहमदाबाद हायवेवर पाणी साचून राहत असल्याने वाहन कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. यावर उपाय करण्यासाठी वाहतूक पोलीस निरीक्षकाने पुढाकार घेऊन हायवेवर पाणी वाहून जाण्यासाठी फुटलेला पाईप बदलण्याचे काम केले. त्यामुळे आता पाणी निचरा होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने वाहतूक कोंडीची डोकेदुखी दूह होण्यास मदत होणार आहे.
हायवेवर ससूनवघर-मालजीपाडा येथे डोंगरावरून येणारे पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी पाईप टाकण्यात आले आहेत. तो तुटल्याने पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे पावसाळा सुरु झाल्यापासून याभागात हायवेवर दोन्ही बाजूला प्रचंड पाणी साचून राहू लागले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन दोन्ही बाजूला तब्बल दहा-दहा किलोमीटरच्या रांगा लागू लागल्या आहेत. याचा परिणाम ठाण्याहून मुंबई आणि मुंबईहून ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांना सहन करावा लागत आहे.
पाईप बदलण्याचे काम आयआरबी या कंपनीकडे आहे. मात्र, कंपनी दुर्लक्ष करीत असल्याने पाईप बदलण्याचे काम रखडून पडले
होते. वसईचे वाहतूक पोलीस निरीक्षक संपत पाटील यांनी स्वत: कंपनीशी संपर्क साधून सोमवार दुपारपासून पाईप बदलण्याचे काम हाती घेतले.