जादूटोणा प्रकरणातील दाम्पत्याला पोलीस कोठडी

By Admin | Updated: August 24, 2015 02:24 IST2015-08-24T02:24:09+5:302015-08-24T02:24:09+5:30

विक्रमगड (आलोंडे) येथील अंधश्रद्धा पसरवून जादूटोणा करणाऱ्यांविरोधात ग्रामस्थांनी घेतलेल्या जोरदार भूमिकेला भक्कम पाठबळ देण्याचे काम लोकमतच्या

Police custody in connection with witchcraft scandal | जादूटोणा प्रकरणातील दाम्पत्याला पोलीस कोठडी

जादूटोणा प्रकरणातील दाम्पत्याला पोलीस कोठडी

हितेन नाईक, पालघर
विक्रमगड (आलोंडे) येथील अंधश्रद्धा पसरवून जादूटोणा करणाऱ्यांविरोधात ग्रामस्थांनी घेतलेल्या जोरदार भूमिकेला भक्कम पाठबळ देण्याचे काम लोकमतच्या (१० आॅगस्ट) वृत्ताने केल्यानंतर विक्रमगड पोलिसांनीही जादूटोण्याच्या नावावर गरीब, अशिक्षित आदिवासींची लूट करणाऱ्या शांताबाई व किसन लहांगे या दोन मांत्रिकांवर गुन्हा दाखल
केला आहे. त्या दोघांना २४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
आलोंडे (वडपाडा) येथे वाडा तालुक्यातील किसन रामा लहांगे व त्यांची पत्नी शांताबाई यांनी काही ग्रामस्थांच्या मदतीने लोकांच्या मनात भीती निर्माण करून पैसे उकळण्याचा प्रयत्न सुरू केला होता. मंत्रतंत्राद्वारे भूतपिशाचांना आवाहन करून अघोरी कृत्ये करण्यास काही लोकांना भाग पाडल्याचेही ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीत म्हटले होते.
प्रेतात्म्याचा वास असल्याची घातली भीती
आलोंडे येथील फिर्यादी संगीता पाचलकर यांना वरील दोन्ही आरोपींनी तुमच्या अंगातील भूत मंत्रतंत्राने काढून देतो, असे सांगितले व त्यांना एक बकरा, कोंबडा व पूजेचे साहित्य आणावयास सांगितले. त्यानंतर, काही दिवसांनी फिर्यादीच्या घरी जाऊन घरामध्ये ५ ते ६ फुटांचा खड्डा खणून येथे प्रेतात्म्याचा वास असल्याने अजून वेगळ्या प्रयोगासाठी दहा हजार रुपयांची मागणी फिर्यादीकडे केल्याचे नंदावळकर यांनी लोकमतला सांगितले.
या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने या दोन्ही आरोपींच्या विरोधात पाठपुरावा करणाऱ्या सुरेश कोती, निवृत्ती वेखंडे, झिंपर भवर, जानू शिंगडा, स्वप्नील काटकरी यांच्यासह विक्रमगड पोलीस
स्टेशन गाठले. पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयात
हजर केले असता २४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Web Title: Police custody in connection with witchcraft scandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.