पोलीस बळाअभावी पालिकेची मोहीम रखडली
By Admin | Updated: May 6, 2017 05:15 IST2017-05-06T05:15:19+5:302017-05-06T05:15:19+5:30
पोलीसबळा अभावी महापालिकेला अनधिकृत बांधकाम विरोधी मोहीम गुडाळावी लागल्याचा संतापजनक प्रकार उघडकिस आला

पोलीस बळाअभावी पालिकेची मोहीम रखडली
संजू पवार /लोकमत न्यूज नेटवर्क
विरार : पोलीसबळा अभावी महापालिकेला अनधिकृत बांधकाम विरोधी मोहीम गुडाळावी लागल्याचा संतापजनक प्रकार उघडकिस आला आहे.
महापालिकेच नालासोपारा क्षेत्रिय कार्यालयाने अनिधकृत बांधकाम तोडण्याची मोहीम हाती घेतली होती. त्या साठी सुरक्षा रक्षक, जेसीबी, कामगार, इंजिनिर, सहायक आयुक्त यांची टिमही तयार करण्यात आली होती. वालीवचे सहायक आयुक्त ग्लिसन गोन्सालविस, नवघरचे राजेश घरत आणि नालासोपाराचे प्रकाश जाधव आपआपले यंत्रणेसह सज्ज झाले होते. मात्र, दुपारचे साडेबारा वाजले तरी मोहीम निघालीच नाही. सगळी यंत्रणा पोलीसांची वाट पाहत बसली होती. अखेर निराश होऊन सहायक आयुक्त प्रकाश जाधव पालिकेत परतले. पोलीस संरक्षण मिळाले नसल्यामूळे मोहीम रद्द करावी लागल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.
अनिधकृत बांधकाम धारकांशी पोलीसांचे हितसंबंध आहेत. त्यामुळे आपल्या संबंधातील बिल्डरचे बांधकाम तोडण्यास पालिका जात असेल तर पोलीस संरक्षण नाकारले जाते. त्यामुळे अश्या बांधकामांना संरक्षण मिळत असलचा आरोप होत आहे. तर दुसरीकडे अपुरे पोलीस बळ आणि नाकाबंदी, बंदोबस्त, गुन्ह्यांची उकल अशी कामे वाढत चालल्यामुळे पालिकेचे मोहिमेला संरक्षण देता येत नाही अशी पालीसांची बाजू असून यात बिल्डरांचा फायदा झाला आहे.