शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
5
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
6
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
7
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
8
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
9
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
10
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
11
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
12
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
13
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
14
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
15
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
16
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
18
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
19
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

नालासोपाऱ्यात पोलिसांची नायजेरियनवर धडक कारवाई; धरपकड सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 23:19 IST

सुमारे ५० ते ६० नायजेरियनांना पोलिसांनी घेतले ताब्यात; कागदपत्रांचीही तपासणी

नालासोपारा : गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे आणि पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी हाती घेतलेल्या मोहिमेअंतर्गत सोमवारी पहाटे तुळींज आणि नालासोपारा पोलीस, दहशतवाद विरोधी पथक, क्यूआरटी पथक, दंगल पथक, होमगार्ड अशा मोठ्या पोलीस फौजफाट्यासह प्रगती नगर परिसरात जाऊन नायजेरियन नागरिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. ५० ते ६० नायजेरियन नागरिकांना तुळींज पोलीस ठाण्यात आणून भारतात राहण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत की नाही याची चौकशी करून तपास करत आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या नेतृत्वाखाली तुळींजचे पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील आणि नालासोपारा पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, क्यूआरटी पथकाचे २५ कर्मचारी, दंगल पथकाचे २५ कर्मचारी, दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील आणि त्यांचे १० कर्मचारी, १० ते १५ होमगार्ड असा तगडा बंदोबस्त घेऊन प्रगती नगर परिसरातील जय माता दि अपार्टमेंट, केडीएम अपार्टमेंट, बसेरा अपार्टमेंट, तारा अपार्टमेंट आणि साई नयन अपार्टमेंटमध्ये जात पोलिसांनी येथे राहत असलेल्या ५० ते ६० नायजेरियन महिला आणि पुरुषांना ताब्यात घेऊन तुळींज पोलीस ठाण्यात आणले. काही नायजेरियन घरे उघडत नसल्याने पोलिसांनी दरवाजे तोडून यांना घराबाहेर काढले आहे. या सर्वांकडे योग्य ती कागदपत्रे, पासपोर्ट आहे का याची चौकशी केली जात असल्याचे उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे यांनी सांगितले. ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचेही ते म्हणाले.परदेशी भाडेकरूची माहिती देणे बंधनकारकनालासोपाºयात राहणाºया नायजेरियन नागरिकांवर अंकुश ठेवण्यासाठी पालघर पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात दोन महिन्यांसाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(२) अन्वये मनाई आदेश लागू केले आहेत. परदेशी नागरिकांची शहानिशा करूनच त्यांना घर, दुकाने हॉटेल तसेच जमीन भाड्याने देण्यापूर्वी त्यांचा रीतसर भाडे करार करून नजीकच्या पोलीस ठाण्यात माहिती दिल्याशिवाय भाड्याने देऊ नये असे आदेश पालघर पोलिसांनी दिले आहेत. या नियमांचा भंग झाल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.