खानिवडे रेतीबंदरावर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:23 IST2018-12-01T00:23:17+5:302018-12-01T00:23:30+5:30

दोन बोटी जाळल्या : लाखोंचा मुद्देमाल जप्त

Police action on Khivee sand dunes | खानिवडे रेतीबंदरावर पोलिसांची कारवाई

खानिवडे रेतीबंदरावर पोलिसांची कारवाई

पारोळ : पोलिसांनी रेती माफियांविरोधात मोहिम खानिवडे रेती बंदरावर कारवाई करून करून दोन बोटी जाळत रेती, ट्रक, दुचाकी असा लाखो रु पयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुरु वारी करण्यात आली. मात्र, या कारवाईच्या वेळी ट्रक चालकांनी पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या.


पोलीस या ठिकाणी गस्ती वर असताना खानिवडे येथील पेट्रोल पंपाजवळ रेतीची वाहतूक करणारा ट्रक पोलिसांच्या निदर्शनात आला त्यावेळी ट्रक ची तपासणी केली असता त्या मध्ये रेती असल्याचे दिसून आले. तसेच या भागात हेडवडे गावाच्या हद्दीत रेती बंदर नंबर ४ व ५ मध्ये सेक्शन पंपातून बेकायदा रेती उपसा होत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करत दोन बोटी जाळत ५६८ ब्रास रेती, सेक्शन पंप, बोटी, दोन ट्रक, दुचाकी असा एकूण ८७ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी बोट व ट्रक मालक यांच्या वर गुन्हा नोंद केला असून विरार पोलीस चौकशी करीत आहेत.

Web Title: Police action on Khivee sand dunes