केमिकल टाकून झाडांची हत्या
By Admin | Updated: May 1, 2016 02:31 IST2016-05-01T02:31:35+5:302016-05-01T02:31:35+5:30
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग ५ मध्ये येणाऱ्या कोपर फाट्यावर झाडांना छीद्र पाडुन त्यामध्ये केमिकल टाकून निलगिरी व अगिस्ता अशा प्रकारची झाड मारण्याचा प्रकार

केमिकल टाकून झाडांची हत्या
वसई/पारोळ : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग ५ मध्ये येणाऱ्या कोपर फाट्यावर झाडांना छीद्र पाडुन त्यामध्ये केमिकल टाकून निलगिरी व अगिस्ता अशा प्रकारची झाड मारण्याचा प्रकार कोपरफाटा येथे उघड झाला आहे. ही झाड अहमदाबाद-मुंबई महामार्गालगत कोपर फाटा येथे असणारा व जाहिरातीचा फलक या झाडामुळे दिसत नसल्यामुळे ही झाड केमिकल टाकून मारली असावीत असा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
झाड मारण्याच्या या प्रक्रियेमुळे कोणालाही संशय येत नसुन झाडाला जागोजागी छिद्र पाडून त्यामध्ये केमिकल टाकल्यानंतर आठ दिवसाच्या आत झाड मरून जाते. या निसर्गाची हानी करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई गरजेचे असल्याचे कोपर येथील गावकऱ्यांनी लोकमतकडे मागणी केली. पालिकेने निसर्ग संवर्धनाचा वसा हाती घेतला असताना पाच नंबर वार्डातील वृक्षांची अशी अशी दशा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचार करायला लावणारी आहे. तसेच वनविभाग अधिकाऱ्यांना विचारले असता ती वृक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असल्याचे सांगितले. त्यामुळे निसर्गाच्या संवर्धनासाठी प्रशासकीय यंत्रणा डोळे झाक करत असल्याने झाडांची कत्तल करणाऱ्या महाभागांचे चांगलेच फावले आहे. (वार्ताहर)