पाइपलाइनचे काम संथ
By Admin | Updated: March 21, 2016 01:03 IST2016-03-21T01:03:52+5:302016-03-21T01:03:52+5:30
जव्हार नगरपरिषद मधील वॉर्ड क्र. ४ मध्ये पिण्याचे पाण्याच्या पाईप लाईनचे काम अत्यंत संथगतीने सुरु असून त्यामुळे पादचारी व वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे

पाइपलाइनचे काम संथ
जव्हार : जव्हार नगरपरिषद मधील वॉर्ड क्र. ४ मध्ये पिण्याचे पाण्याच्या पाईप लाईनचे काम अत्यंत संथगतीने सुरु असून त्यामुळे पादचारी व वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच पाणीपुरवठ्यातील अडचणींमुळे नागरीक त्रस्त झाले आहेत.
हे पाईप लाईनचे काम बस स्थानकाच्या मागे वॉर्ड क्र ४ मध्ये सुरु असून, डॉम आळी मेन रोडलगत ठेकेदाराने पाईप गाडण्यासाठी खोल खड्डे व गटार खोदून ठेवली आहे. त्यामुळे या वॉर्ड क्र ४ मधील नागरिकांना ये-जा करणे त्रासाचे झाले आहे. तसेच या वार्डात पाणी टंचाईला सुरवात झाली आहे. खडड्यामुळे विद्यार्थी व पादचाऱ्यांना तसेच वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पाईप लाईनच्या कामाला सुरवात करून, दोन महिने उलटायला आले, तरीही काम पूर्ण झालेले नाही. हे पाईप लाइंचे काम पूर्ण करण्यासाठी येथील महिलांनी नगरपरिषदेकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. (वार्ताहर)