शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

पालघर विधानसभा संघातील मतदार युतीच्या मागे भक्कमपणे उभे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:51 AM

विधानसभेतील मतदारांनी १ लाख ११ हजार ७९४ मतांची भरभक्कम रसद पुरवीत सुरुवातीपासूनच आघाडी मिळवून देण्यात विजयाचा वाटा उचलला.

- हितेंन नाईकपालघर : या लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या विजयी झालेल्या राजेंद्र गवितांना सेनेचा अभेद्य बालेकिल्ला असणाऱ्या पालघर विधानसभेतील मतदारांनी १ लाख ११ हजार ७९४ मतांची भरभक्कम रसद पुरवीत सुरुवातीपासूनच आघाडी मिळवून देण्यात विजयाचा वाटा उचलला. यामुळे येत्या विधानसभेत सेनेच्या उमेदवाराच्या विरोधात कुठल्याही पक्षाचा उमेदवार टिकाव धरू शकेल असे वाटत नाही.पालघर लोकसभा मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेनेने युतीच्या नावाखाली भाजपकडून पालघर लोकसभा मतदारसंघ हा अनेक वर्षांपासून भाजपकडे असणारा विजयी मतदार संघ स्वत:साठी मागून घेतला. २०१८ च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून लढणाºया श्रीनिवास वनगांना उमेदवारी मिळेल असे वाटत असतांना आपला प्रतिस्पर्धी असणाºया बहुजन विकास आघाडी या पक्षाला काँग्रेस, राष्ट्रवादी, सीपीएम आदी महत्त्वपूर्ण पक्षांचा पाठिंबा मिळणार असल्याने त्यांच्या वाढलेल्या ताकदीला टक्कर देण्यासाठी श्रीनिवास वनगा हा चालणार नाही. अशी पक्की खात्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची होती. आणि केंद्रात पुन्हा युपीए सरकार स्थापन करायचे असेल तर एक एक खासदार महत्वाचा असेल त्यामुळे विरोधकांच्या तोडीचा उमेदवार आपल्याला उभा करावा लागेल, याची जाणीव असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या चर्चेअंती भाजपचे खासदार राजेंद्र गवितांच्या हाताला शिवबंधन बांधण्यात येऊन शिवसेनेने त्यांची उमेदवारी घोषित केली. भाजपचा विजयी मतदार संघ शिवसेनेला देण्यात आल्याने भाजपमधून सुरू झालेले राजीनामा सत्र मुख्यमंत्र्यांनी वेळीच शमवले. तर दुसरीकडे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत ज्या राजेंद्र गवितांना नंदुरबारला पाठविण्याची ओरड केली त्यांनाच पुन्हा निवडून द्या असे कोठल्या तोंडाने मतदारांना सांगणार? हा शिवसैनिकांना पडलेला प्रश्न ज्या शिवसैनिकांनी केली होती त्यांनी पुन्हा आता आमच्या गवितांना निवडून द्या असे कोणत्या तोंडाने सांगायचे असा प्रश्न पडला होता. त्यामुळे शिवसैनिकात थोडी नाराजी होती. त्यामुळे भाजप व शिवसेनेत असणारी नाराजी भोवणार का? अशी शक्यता व्यक्त केली जात असतांना केंद्रात व राज्यात असलेली सत्ता टिकविण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आ.फाटक यांनी दोन्ही पक्षातील नाराजांना समजावले. त्यामुळे दोन्ही पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागले. पालघर नगरपरिषदेवर ही भाजप-सेनेची सत्ता आल्याने सर्व नगरसेवक कामाला लागले होते. पालघर विधानसभा मतदार संघाची जबाबदारी असलेल्या जिल्हाध्यक्ष राजेश शहा, विधानसभा क्षेत्र प्रमुख वैभव संखे, तालुकाध्यक्ष विकास मोरे आदींनी संपूर्ण भाग पिंजून काढला. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही जोमाने काम केले. विरोधकांना शिरकाव करण्याची संधीच दिली नसल्याने गवितांना या मतदारसंघातून तब्बल ६० हजार १०१ मतांची आघाडी मिळवून देण्यात यश मिळाले.पालघर विधानसभा मतदार संघात मच्छीमारांचे असलेले हद्दीचे वाद, डिझेल अनुदान परताव्याची कोट्यवधी रुपयांची थकीत रक्कम, बुलेट ट्रेन, जिंदाल ेजेट्टीला मिळालेली परवानगी, वाढवण बंदर, प्रदूषण आदी अनेक प्रश्नांबाबत स्थानिकांनी उध्दव ठाकरेंना लक्ष घालण्याची विनंती केली.२०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात स्वतंत्रपणे लढले होते. भाजपकडून लढणाºया राजेंद्र गवितांना पालघर विधानसभा मतदार संघातून ५६ हजार २१५ तर सेनेच्या श्रीनिवास वणगांना ५४ हजार ४५३ मते अशी एकूण १ लाख १० हजार ६६८ मते मिळाली होती. यावेळी भाजप-सेना एकत्र लढल्यानंतर त्यांना एकूण १ लाख ११ हजार ७९४ इतकी मते मिळाली.