शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

जागा आडविणाऱ्यांना झाला दंड; रेल्वेकडून १६० प्रवाशांवर कडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:45 IST

लोकलमध्ये जागा अडविणा-या १६० प्रवाशांवर रेल्वेने चार्जशीट दाखल केले असून त्यांना कोर्टाने ५०० ते २०० रूपये दंड ठोठावला आहे , असे रेल्वे सुरक्षा बलाचे प्रमुख डी.एन मल्ल यांनी लोकमतला सांगितले.

नालासोपारा : लोकलमध्ये जागा अडविणा-या १६० प्रवाशांवर रेल्वेने चार्जशीट दाखल केले असून त्यांना कोर्टाने ५०० ते २०० रूपये दंड ठोठावला आहे , असे रेल्वे सुरक्षा बलाचे प्रमुख डी.एन मल्ल यांनी लोकमतला सांगितले. यामुळे जागा अडविण्याची दादागिरी करणाºया टोळक्यांना आता आळा बसणार आहे.त्यासाठी विरार ते बोरीवली दरम्यान चार पथके बनविण्यात आली आहेत. मीरारोड ते बोरीवली दरम्यान पकडलेल्यांवर कलम १५६ नुसार अंधेरी कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यांना रेल्वे कायद्यानुसार ५०० रुपये दंड ठोठावण्यात आला. भार्इंदर ते विरार दरम्यान पकडलेल्यांना वसई कोर्टात हजर करण्यात आले. त्यांनाही ३०० ते २०० रुपये दंड ठोठावण्यात आला. डहाणू-पालघर ते वसई-विरार भागातून दररोज लाखो प्रवासी नोकरीधंद्यानिमित्त लोकल ट्रेनने प्रवास करत असतात. मात्र प्रवासादरम्यान दारात उभे राहून प्रवाशांचा मार्ग अडविणे, आपल्या सहकाºयांसाठी डब्यातील सीट राखून ठेवणे, चर्चगेटवरून येणारी विरार लोकल असेल तर अंधेरी, बोरिवली येथील प्रवाशांना उतरू न देणे असे अनेक प्रकार रोज घडत असतात. यातूनच अनेकदा वेगवेगळ्या ग्रुपमध्ये हाणामारीची प्रकारही घडले आहेत. याचा त्रास सर्वसामान्य प्रवाशांना होत असतो. यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपही तयार करण्यात आले आहेत. रेल्वे सुरक्षा सरांच्या या धडक मोहिमेमुळे सर्वसामान्य प्रवाशांनी स्वागत केले असून, दारात जागा अडवून हवा खाणाºया मुजोर प्रवाशांना आता दादागीरी केल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. यापूर्वीही अशा स्वरुपाची कारवाई झाली आहे. मात्र तिच्यात सातत्य नसल्याने तिचा प्रभाव फारसा जाणवत नाही त्यामुळे यावेळी तरी ते राखावे, अशी अपेक्षा आहे.दादागिरी करण्यात महिला प्रवासीही आघाडीवरविरार येथील ऋतुजा नाईक या महाविद्यालयीन तरु णीला वसई रोड येथे उतरू न देता चार महिला प्रवाशांनी २८ जून २०१६ ला मारहाण केली होती. यावेळी त्या चार महिलांवर दुसºया दिवशी कारवाई करून कोर्टात हजर केले होते.डहाणू लोकलमधून पडलेल्या विरारच्या एका प्रवाशाला उतरू न दिल्यामुळे रेल्वे पोलिसांनी १४ प्रवाशांना विरार स्थानकातून २० आॅक्टोबर २०१६ ला अटक केली होती.नालासोपारा येथील महिला प्रवासी प्रभा देवा यांना चर्चगेट लोकलमध्ये १९ सप्टेंबर २०१७ ला मारहाण करण्यात आली होती.सपना मिश्रा या तरुणीला सप्टेंबर २०१७ ला वांद्रे-सुरत इंटरिसटी एक्सप्रेसमध्ये तीन महिलांनी जागेवरून मारहाण केली होती.पवन तिवारी या प्रवाशाला विरार येथे उतरू दिले नव्हते.याबाबत रेल्वे सुरक्षा बलाला तक्र ार दिल्यानंतर १७ आॅक्टोबर २०१७ ला १७ जणांवर कारवाई करण्यात आली होती.डहाणू-चर्चगेट लोकल विरार स्थानकात आल्यावर दरवाजे बंद केल्यामुळे विरार येथील महिलांना डब्यात न चढता आल्यामुळे रेल्वे वाहतूक सहा मिनिटे खोळंबली होती.हि घटना ८ नोव्हेंबर २०१७ रोजी घडली होती.व्हॉटसअ‍ॅपचा वापरविरार ते बोरीवली दरम्यान रेल्वे सुरक्षा बलाच्या चार तुकड्या बनविण्यात आल्या आहेत. सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळी चार तास हे पथक काम करणार असून त्यांचे व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ग्रुप बनविण्यात आले आहेत.जर कोणी जागा अडवून दादागीरी करीत असेल तर त्याचे मोबाईलवर चित्रीकरण करून रेल्वे सुरक्षा बलाला कळविण्यात येईल त्यानुसार पुढील स्टेशनवर लगेच कारवाई केली जाणार आहे.दादागिरी करणाºया प्रवाशांविरोधात रेल्वे पोलिस नियमित कारवाई करीत असतात. जर कुणी जागा अडवून प्रवाशांना त्रास देत असेल तर त्याच्या विरोधात आमच्याकडे तक्र ारी केल्यास आंम्ही कायदेशीर कारवाई करू.- विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,वसई रोड रेल्वे पोलिस ठाणेरेल्वे पोलिसांकडून सुरू असलेल्या या मोहिमेचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. विरार पल्याड सफाळा, वैतरणा, केळवा रोड येथे प्रवाशांनाही हा त्रास सहन करावा लागतो. दोन दिवसांपूर्वी बलसाड फास्ट पॅसेंजर मध्ये काही मुलांकडून विरारला महिला प्रवाशांना धक्काबुक्की करण्यात आली होती. याबाबत केळवे रोड स्थानकावर तक्र ार दाखल करण्यात आली आहे.- प्रथमेश प्रभू तेंडुलकर,डहाणू वैतरणा प्रवासीसेवाभावी संस्था

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMumbai Localमुंबई लोकल