शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
3
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
4
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
5
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
6
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
7
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
8
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
10
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
11
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
12
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
13
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
14
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
15
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
16
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
17
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
18
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
19
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
20
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका

रेल्वेस्थानक, लाेकल, लांब पल्ल्याच्या गाड्यांत प्रवाशांचा मास्कविना वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 00:21 IST

काेराेनाचे नियम धाब्यावर : फिजिकल डिस्टन्सिंगचा गर्दीमुळे उडताेय फज्जा

लोकमत न्यूज नेटवर्क पारोळ : सर्वसामान्यांसाठी बंद असलेल्या लाेकलमुळे अनेकांना जादा पैसे मोजून आणि आटापिटा करून कामाचे ठिकाण गाठावे लागत हाेते. त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सुरू असलेली लाेकल सेवा सर्वांसाठी खुली करण्याची मागणी जाेर पकडत हाेती. अखेर या मागणीची दखल घेउन काही नियम आणि अटी-शर्तींसह सर्वसामान्य प्रवाशांना १ फेब्रुवारीपासून परवानगी देण्यात आली. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये कामाला जाणाऱ्या नाेकरदारांना माेठा दिलासा मिळाला. मात्र, लाेकल प्रवास सुरू हाेताच माेठ्या प्रमाणात गर्दी वाढून काेराेनाच्या सुरक्षा नियमांनाच प्रवाशांनी गर्दीत चिरडून टाकल्याचा प्रत्यय येत आहे. मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून प्रवासी बेफिकीरपणे प्रवास करताना दिसत आहेत.

रेल्वेस्थानक आणि लोकलमध्ये दरराेज गर्दी वाढत आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा यंत्रणेच्या डाेळ्यादेखतच फज्जा उडत असताना त्याकडे दुर्लक्ष करावे लागत आहे. लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या अशा दाेन्हींकडे हीच स्थिती आहे. मास्क हा नाक आणि ताेंड झाकेल अशा पद्धतीने घालणे अपेक्षित आहे. मात्र, अनेकांचा मास्क हा अलगद हनुवटीवर आलेला पाहायला मिळताे. अनेक जण तर अशा स्थितीत इतरांशी गप्पा आणि फाेनवर बाेलत असल्याचे चित्र सर्रास पाहायला मिळते.  काही प्रवासी तर चक्क तो डोळ्यावर लावून झाेप काढत असल्याचेही दिसते. लॉकडाऊन उठल्यानंतर  लांब पल्ल्याच्या गाड्या जिल्ह्यातून धावत आहेत. त्यातील काही गाड्यांना विरार, पालघर, डहाणू येथे थांबे आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून लोकलमध्ये जनजागृती केली जात आहे. 

स्वत:च्या सुरक्षेकडे लक्ष देणे आवश्यक

nलांब पल्ल्याच्या गाड्यांतील आरक्षित असणारे डबे सॅनिटाइज केले जातात. पण त्यांचा प्रभाव फार काळ टिकत नाही. त्याचप्रमाणे प्रवासीही सॅनिटायझर वापरण्यास उदासीन असल्याचे दिसून येत आहे. nरेल्वे प्रवासात स्वच्छतागृहाचीही साफसफाई होत नसून तेथूनही कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. काेराेनापासून संरक्षण करण्यासाठी प्रवाशांनी स्वसुरक्षेवर भर देणे आवश्यक आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने कडक नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. यात ढिलाई केली तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे.  

फलाटावरील गर्दी कमी करण्यासाठी  फलाट तिकिटात पाचपट वाढ मुंबईहून देशभरात जाणाऱ्या गाड्या पालघर जिल्ह्यातून जातात. त्यामुळे वसई, विरार, पालघर, डहाणू या रेल्वेस्थानकांत मोठी गर्दी असते. ती अनावश्यक गर्दी कमी करण्यासासाठी रेल्वे प्रशासनाने फलाट तिकीट १० रुपयांवरून ५० रुपये केले आहे. 

रेल्वेप्रवासात मास्क बंधनकारक आहे. ते नसल्यास प्रवास करता येत नाही. मास्क नसल्यास महापालिकेचे कर्मचारी याबाबत कारवाई करतात. कोरोनाचे नियम - अटींचे पालन करूनच प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे हे नियम आपल्या सुरक्षेसाठी प्रत्येकाने पाळणे आवश्यक आहे. अन्यथा कारवाई करण्यात येईल. -  सचिन इंगवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई रोड

 

टॅग्स :localलोकलMumbaiमुंबईrailwayरेल्वे