जव्हार एसटी स्थानकात पाण्यासाठी प्रवाशांचे हाल
By Admin | Updated: May 6, 2017 05:16 IST2017-05-06T05:16:33+5:302017-05-06T05:16:33+5:30
दररोज हजारो प्रवाशांची ने आण करणाऱ्या जव्हार एसटी स्थानकामध्ये प्यायचे पाणीच नसल्याने भर उन्हाळ्यातील काळात प्रवाशांचे

जव्हार एसटी स्थानकात पाण्यासाठी प्रवाशांचे हाल
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : दररोज हजारो प्रवाशांची ने आण करणाऱ्या जव्हार एसटी स्थानकामध्ये प्यायचे पाणीच नसल्याने भर उन्हाळ्यातील काळात प्रवाशांचे हाल होत आहेत. हा आदिवासी भाग असल्याने तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या गोरगरिबांकडे बाटली बंद पाणी घेण्या इतके पैसे नसतात. किंवा त्यांना ते परवडत नसल्याने बिकट अवस्था असते.
जुनाट व गळक्या टाकीत पाण्याचा थेंबही थांबत नाही. जव्हार एसटी आगार डेपोतून झाप, दापटी, तिलोडा, सारसून, साकुर, वनवासी, चालतवड,
रु ईघर दाभेरी, या खेड्यापाड्यात जानाऱ्या एसटी बरोबर जव्हार एसटी बसस्थानकातून जव्हार, नाशिक, शिर्डी, सेलवास, डहाणू, ठाणे, कल्याण, वाडा, विक्र मगड, मोखाडा, आदी भागांमध्ये येथून दररोज ४२ बस जात असतात. मात्र जव्हारच्या एसटी बसस्थानाकात प्रवाशांना पिण्यासाठी मिळत नसल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत.
जव्हारच्या एसटी व्यवस्थापनाकडून बसस्थानकात पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. बांधलेली पाण्याची टाकी जुनाट व गळकी झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांना हॉटेल्स, टपऱ्या, चहा स्टॉल येथून पाणी प्यावे लागत आहे. एसटी प्रवाशांना पाणी मिळावे म्हणून प्रवाशी सतत एसटी महामंडळाकडे मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते.