शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

भूमाफियांसोबत पार्टी महागात, वसई-विरार महापालिकेच्या दोन अभियंत्यांची हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 11:53 IST

पालिकेच्या पेल्हार ‘एफ’ प्रभागातील ठेका अभियंता भीम रेड्डी तसेच चंदनसार प्रभागातील ठेका अभियंता मिलिंद शिरसाट यांची एक चित्रफीत वायरल झाली होती. 

नालासोपारा : भूमाफियांसोबत पबमध्ये केलेली पार्टी आणि तरुणींसोबत केलेले नृत्य वसई-विरार महापालिकेच्या दोन अभियंत्यांना चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पालिकेने त्यांची सोमवारी तडकाफडकी हकालपट्टी केली आहे. पालिकेची प्रतिमा मलिन करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. भीम रेड्डी आणि मिलिंद शिरसाट, अशी हकालपट्टी केलेल्या या दोन अभियंत्यांची नावे आहेत.

पालिकेच्या पेल्हार ‘एफ’ प्रभागातील ठेका अभियंता भीम रेड्डी तसेच चंदनसार प्रभागातील ठेका अभियंता मिलिंद शिरसाट यांची एक चित्रफीत वायरल झाली होती. 

वसई-विरार शहरात अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांसोबत हे दोघे एका पबमध्ये पार्टी करताना दिसत होते. त्यांच्यासोबत काही तरुणी नृत्य करीत होत्या. ही चित्रफीत व्हायरल होताच खळबळ उडाली होती. त्याची गंभीर दखल घेत पालिकेने त्यांची हकालपट्टी केली आहे.

‘कर्तव्यात कुणीही कसूर केल्यास कठोर कारवाई’अतिक्रमण विभागात हे दोघे अभियंता काम करत होते. तरीदेखील अतिक्रमण करणाऱ्या भूमाफियांसोबत पार्टी करणे अत्यंत गंभीर आहे.

सार्वजनिक ठिकाणी नृत्य करून त्यांनी पालिकेची प्रतिमा मलिन केली आहे. त्यामुळे या दोघांची हकालपट्टी केली असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी दिली. 

कर्तव्यात कुणीही कसूर केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

चित्रफीत आठ महिने जुनी-    ही चित्रफीत आठ महिने जुनी आहे. एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते या चित्रफितीच्या आधारे या दोघांना ब्लॅकमेल करत होते. या दोन अभियंत्यांनी त्यांना लाखो रुपये दिल्याचीही चर्चा आहे.-    २०१७ मध्येदेखील एका खासगी पार्टीत नृत्य करणाऱ्या १२ अभियंत्यांना निलंबित करण्यात आले होते. 

टॅग्स :sandवाळूmafiaमाफिया