शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पालघर लोकसभेसाठी बविआची मोर्चेबांधणी; राष्ट्रवादी, सीपीएमशी संपर्क?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 22:58 IST

देशभरात रविवारपासून निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे.

वसई : निवडणूकीचे वारे वाहू लागल्यानंतर रविवारी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा आमदार हितेंद्र ठाकुर यांनी पालघर लोकसभा निवडणूक आमचा पक्ष लढवणार, तसेच जे पक्ष मदत करतील त्यांच्या सोबत आपण असल्याचे लोकमतशी बोलताना सांगीतले.देशभरात रविवारपासून निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. गतवर्षी खासदार अ‍ॅड. चिंतामण वनगा यांच्या अकस्मात मृत्यूमूळे पालघर लोकसभा पोटनिवडणूक घेतली गेली. ही जागा भाजपाची होती व ती भाजपानेच शेवटपर्यंत राखली, मात्र एकेकाळी मित्रपक्ष असलेला शिवसेना पक्ष या निवडणूकित दुखावला गेला होता. सर्व ताकतीनिशी शिवसेनेने पोटनिवडणूकीत उतरत अपेक्षेपेक्षा जास्त मत घेत भाजपाला धक्का दिला. त्याचप्रमाणे जिल्हात तीन आमदार व वसई विरार पालिकेवर सत्ता असलेल्या बहुजन विकास आघाडीनेही आपला उमेदवार उभा केला होता. या पक्षाचे काम केलेला उमेदवार २००९ ला खासदार झाला होता. त्यानंतर गेल्या दोन निवडणूकीत त्यांनी आपला उमेदवार उभा केला होता.दरम्यान, बविआ आपल्या सोबत इतर पक्षांना सोबत घेऊन जाणार असल्याचे स्पष्ट संकेत आमदार हितेंद्र ठाकुर यांनी दिल्याने निवडणूक दुहेरी रंगणार असल्याचे स्पष्ट चिन्हे आहेत.गेल्या पोटनिवडणूकीच्या काळात बविआचे अध्यक्ष तथा आमदार हितेंद्र ठाकुर यांनी, आम्हाला उमेदवार आयात- निर्यात करण्याची गरज नाही. बहुजन विकास आघाडी ही पोटनिवडणूक लढवणार आणि आमचाच खासदार निवडून येणार असा दावा केला होता. मात्र, शिवसेना व भाजपाच्या अटीतटीच्या लढाईत बविआ तीन नंबरवर फेकला गेला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना वनगांच्या भावनीक विषय घेऊन पुढे आली. बविआचे पालघर जिल्ह्यात अस्तित्व मोठे आहे. आताही भाजप- सेना युतीनंतर पालघरसाठी शिवसेना आपला उमेदवार लढवत असली तरी बविआ देखील पुर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरणार आहे.पालघर लोकसभा निवडणूक बविआ लढवणार.इतर पक्षांच्या सहकार्याने आमचा उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरणार.उमेदवार कोण असेल ते आम्ही नंतर जाहिर करू .- आमदार हितेंद्र ठाकुर,अध्यक्ष, बहूजन विकास आघाडी

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९NCPराष्ट्रवादी काँग्रेसHitendra Thakurहितेंद्र ठाकूरShiv SenaशिवसेनाBJPभाजपा