पालघरचा आज फैसला
By Admin | Updated: February 16, 2016 02:21 IST2016-02-16T02:21:12+5:302016-02-16T02:21:12+5:30
पालघर पोट निवडणुकीची मतमोजनी उद्या पालघरच्या सेंट जॉन कॉलेज (मनोर रोड) मध्ये सकाळी ८ वाजल्या पासून सुरु होणार असून पालघर मनोर रस्त्यावरील रहदारी सुरळीत सुरु राहणार आहे.

पालघरचा आज फैसला
पालघर : पालघर पोट निवडणुकीची मतमोजनी उद्या पालघरच्या सेंट जॉन कॉलेज (मनोर रोड) मध्ये सकाळी ८ वाजल्या पासून सुरु होणार असून पालघर मनोर रस्त्यावरील रहदारी सुरळीत सुरु राहणार आहे. मात्र मतमोजणी जागे पासून १०० मीटर क्षेत्र जमावा साठी निषिद्ध ठेवण्यात आले आहे.
पालघर विधानसभा पोट निवडणुकीच्या मतमोजनीच्या दृष्टीने पोलिस, निवडणूक विभाग सज्ज झाले असून पालघर मनोर रस्त्यावरील मोठी रहदारीला कुठेही अडथळा होणार नाही या दृष्टीने उपाय योजना आखण्यात आल्या आहेत. विधान सभा क्षेत्रात एकूण ३१३ बूथ वरून आलेल्या ए. व्ही. एम मशीन मध्ये उमेदवारांचे भविष्य बंद झाले आहे. मतमोजणी दरम्यान घेण्यात येणाऱ्या दक्षते बाबत निवडणूक निर्णय अधिकारी उमेश बिरारी आणि सहा. अधिकारी चंद्रसेन पवार यांनी बैठक घेत महत्वपूर्ण सूचना केल्या.
पालघर पोटनिवडणुकीमध्ये झालेल्या मतदानाचा अंदाज घेत कांग्रेस, बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेने आपापल्या विजयाचा दावा केला असून त्या दृष्टीने होणारी गर्दी पाहता पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. २ अप्पर पोलिस अधिक्षकसह ५ उपविभागीय पोलिस अधिकारी, ३० पोलिस निरीक्षक, सहा.पोलिस निरीक्षक, उप पोलिस निरीक्षक २५० पोलिस कर्मचारी, १५० होमगार्ड,
दंगल नियंत्रण दल, राज्य राखीव पोलिस दल इ. कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सेंट जॉन कॉलेज पासून पालघर कडे जाणारा आणि मनोर कडे जाणारा १०० मीटरचे क्षेत्र जमावासाठी निषिद्ध करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी जयंत बजबले यांनी दिली. (वार्ताहर)