शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पालघर जि. प. सदस्यास डांबून ठेवले, ठाकरे गटाच्या चौघांविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 09:45 IST

Palghar: बाळासाहेबांची शिवसेना या पक्षातील मंगेश भोईर यांना दमदाटी करून मतदान केल्यास पाच लाख रुपये देऊ, असे आमिष दाखवले व त्यांना बळजबरीने डांबून ठेवले. या प्रकरणी चार आरोपींविरोधात ॲट्रॉसिटी व विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाल्याचे पनवेल तालुका पोलिसांनी मंगळवारी सांगितले.

नवीन पनवेल : पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारास मतदान करावे, यासाठी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षातील मंगेश भोईर यांना दमदाटी करून मतदान केल्यास पाच लाख रुपये देऊ, असे आमिष दाखवले व त्यांना बळजबरीने डांबून ठेवले. या प्रकरणी चार आरोपींविरोधात ॲट्रॉसिटी व विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाल्याचे पनवेल तालुका पोलिसांनी मंगळवारी सांगितले.

पास्थळ, जिल्हा पालघर येथील मंगेश दयानंद भोईर हे २०१९ ला शिवसेना पक्षातर्फे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. पालघर जिल्हा परिषदेच्या महिला राखीव अध्यक्षपदाचा अडीच वर्षे कालावधी संपल्याने पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक १६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यावेळी या निवडणुकीत उद्धव ठाकरे पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला मतदान करावे, यासाठी धाकटी डहाणू जिल्हा परिषद गटाचे सदस्य जयेंद्र किसन दुबळा, मोज जिल्हा परिषद गटाचे सदस्य अरुण ठाकरे, अमेय विकास पाटील व पालघर जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी दबाव आणला. तसेच ८ नोव्हेंबर रोजी पंकज देशमुख व दोन अनोळखी जणांनी यांना गाडीत बसवून मोबाइल हिसकावून बंद करून विरार येथील उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यालयामध्ये नेले. तेथे चार -पाच तास कुठेही जाऊ  न देता ठाकरेंच्या पक्षातील अध्यक्षपदाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी आमिष व धाक दाखवला. त्या ठिकाणी अरुण ठाकरे, जयेंद्र दुबळा व अमेय पाटील आले. त्यांनीसुद्धा दमदाटी करून मतदान केल्यास पाच लाख रुपये देण्याचे आमिष  दाखविल्याचे भोईर यांनी तक्रारी म्हटले आहे. 

... आणि नजर चुकवून गाठले विराररक्कम स्वीकारण्यास नकार दिला असता त्यांनी पुन्हा त्याच गाडीमध्ये बसवून वरळी मुंबईत हिल व्हिलेज हॉटेल या ठिकाणी रात्रीस नेले. त्या ठिकाणी सहा अनोळखी व्यक्ती व त्यांच्यासोबत या चारही जणांनी त्यांना दमदाटी करून दोन दिवस मानसिक तणाव दिला. १० नोव्हेंबर रोजी त्यांची नजर चुकवून तेथून पळून  आपण टॅक्सी पकडून लोकलने विरारला आलाे. त्यानंतर एकाच्या मोबाइलवरून त्यांनी रवींद्र फाटक यांना घडलेला प्रकार सांगून पास्थळ येथे सुखरूप पोहोचलो. सर्व जण पुन्हा गाठून अपहरण करतील, या भीतीने आपण पनवेल येथील एका हॉटेलमध्ये थांबलो. नंतर याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात जयेंद्र किसन दुबळा, अरुण ठाकरे, अमेय विकास पाटील, पंकज देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याचे भोईर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :palgharपालघरShiv SenaशिवसेनाCrime Newsगुन्हेगारी